Headlines

गरजू रुग्णांना त्वरित उपचार द्या:हॉस्पिटलमध्ये 25टक्के बेड राखीव ठेवा, दुष्काळावर उपाययोजना




सोलापूर सध्या जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे धर्मादाय आणि कॉर्पोरेट रुग्णालयांना गरीब रुग्णांसाठी २५ टक्के बेड राखीव ठेवणे बंधनकारक आहे. उपचारांपूर्वी पैशांची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर आता कठोर कारवाई होईल. नवीन “टीएमएस २.०’ प्रणालीमुळे उपचार मंजुरीची प्रक्रिया अवघ्या सहा तासांत पूर्ण होईल, अन्यथा ती आपोआप मंजूर मानली जाईल. तसेच, रुग्णांनी आधी भरलेली रक्कम परत मिळणेही अनिवार्य करण्यात आल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली. सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तत्पूर्वी त्यांनी नियोजन भवन या ठिकाणी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील आयुष्मान योजनेच्या अंमलबजावणीत मागील काही काळात लक्षणीय सुधारणा झाली. आतापर्यंत सुमारे १८ लाखांहून अधिक (४५ टक्के) लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड तयार झाले आहेत. मात्र योजनेत सहभागी हॉस्पिटल संख्या नगण्य आहे. शहरात २०० हॉस्पिटल आहेत मात्र जीवनदायी योजनेत मात्र १९ हॉस्पिटल सहभागी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात या योजनेचे एकूण ४० लाख ९१ हजार लाभार्थी आहेत. दुसऱ्या आढावा बैठकीच्या वेळेस आयुष्यमान कार्ड काढणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्के होते, त्यात तिसऱ्या बैठकीत हे प्रमाण १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. महात्मा ज्योतिबा फुले व पंतप्रधान आयुष्यमान या योजनांसाठी नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे नवीन एकत्रित पोर्टल आणि ट्रान्झॅक्शन मॉडेल सिस्टिम सुरू झाली. तेव्हापासून नोव्हेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील ७७,५०२ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी जिल्ह्याला २३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. १.सोलापूर जिल्ह्यात जीवनदायी योजनेत २२७ हॉस्पिटल आहेत, त्यामध्ये खासगीची ११० खासगी हॉस्पिटलचा समावेश आहे. सोलापूर शहरातील १९ रुग्णालये या योजनेत अंगीकृत आहेत. २.मनपा आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांची बैठक घेऊन, त्यांना प्रेमाने आणि वेळ पडल्यास सक्तीने या योजनेत सहभागी करून घ्यावे. जेणेकरून शहरातील नागरिकांना योजनेचा लाभ मिळेल, अशी सूचना शेटे यांनी केली. ३. पूर्वीची १,३५६ उपचार पॅकेजेस वाढवून आता २,३९९ करण्यात आली आहेत.​- योजनेचे बजेट ४००-४५० कोटींवरून ५,४०० कोटी रुपयांवर गेले आहे. ४. नागरिकांना घरबसल्या कार्ड काढण्यासाठी, माहिती घेण्यासाठी किंवा तक्रारी नोंदवण्यासाठी ७२९०८२३८३८ हा “आयुष्मान सारथी’ व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर “हाय’ पाठवल्यास सर्व सुविधा उपलब्ध होतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *