![]()
भोंदू अशोक खरातच्या जमीन घोटाळ्यातील साक्षीदार, खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि शिर्डीतील नामांकित बांधकाम व्यावसायिक डॉ.जितेंद्र गणपतराव शेळके यांचा अपघात नाही, घातपातच झाला आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. वाहन चालक काहीही जबाब देऊ द्या, हा घातपातच आहे. नेमके त्याला का मारले? आणखी कोणावर गुन्हे का दाखल करण्यात आले नाही,असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी जे कोणी अधिकारी, राजकीय नेते सहभागी आहेत त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले गेले नाहीत? काय लपवले जात आहे? भाजपचे बाहेर ठेवलेले प्रवक्ते यांच्याकडे सीडीआर जातो आणि सरकारला काही माहिती नाही. याचा अर्थ हा अशोक खरात राज्यातील भाजप आणि महायुती सरकारचा प्यादा आहे. त्यांच्या माध्यमातून धर्म भ्रष्ट केला जात आहे. अशोक खरातकडून सर्व माहिती घेऊन त्याला जेलमध्येच मारले जाईल असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. व्यापम घोटाळ्यातील अनेकांचे अपघात नाना पटोले म्हणाले की, डॉ.जितेंद्र शेळके यांचा काल अपघात झाला नाही तर घातपात झाला आहे. त्याच्याकडे सर्व माहिती होती. हे कोणी केले? त्यालाच टार्गेट का केले गेले. मध्यप्रदेशमध्ये भाजप सरकार असताना एक परीक्षा घोटाळा झाला होता त्यावेळी सर्वांना मारुण टाकले, सर्वांचे असे वेगवेगळे अपघात झाले. व्यापम घोटाळ्यात हे सर्व आपण पाहिले आहे. सर्व नष्ट करायचे आणि आमच्याकडे पुरावाच नाही असे मांडायचे आणि काही तरी गायब करायचे काम होऊ शकते. अशोक खरातला कसेही मारू शकतात. यांचा काही भरोसा नाही. फायद्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव दुसरीकडे सोशल मिडीयावर पोस्ट करत नाना पटोले यांनी महिला आरक्षणाच्या मुद्यावर सरकारवर टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले की,महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कोणताही विरोध केलेला नाही. उलट, 2024 च्या निवडणुकीपूर्वीच महिला आरक्षण तत्काळ लागू करण्याचा आग्रह काँग्रेस आणि इंडिया आघाडीने सातत्याने केला होता.परंतु भाजपने महिला आरक्षणाच्या नावाखाली आपल्या राजकीय फायद्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव आखला होता. ही मनुवादी रणनीती लोकसभेत यशस्वी झाली नाही.
भाजपने ढोंगीपणा थांबवावा नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना मी 20/09/2023 रोजी महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांनी केलेल्या अभिनंदनाच्या ट्विटची आठवण करून देतो आणि त्यांना सल्ला देतो की हा ढोंगीपणा थांबवावा. “लाडक्या बहिणी” आणि शेतकरीविरोधी मनुवादी अजेंडा राबवणाऱ्या सरकारने जनतेची दिशाभूल करणे बंद करावे. फडणवीस हे संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. संघ आणि भाजपची मनुवादी व महिलांविरोधी विचारसरणी महिलांना किती न्याय आणि अधिकार देते, हे त्यांना अधिक चांगले माहिती आहे. तसेच, संस्कृतीच्या नावाखाली विरोधकांवर टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या वागणुकीकडेही पाहणे गरजेचे आहे. बँड लावून डान्स करण्याची संस्कृती विरोधकांची नाही. इस्राईलला जाऊन World War Criminal समोर कोणी डान्स केला होता हे sixteen या नंबरच्या माध्यमातून सर्व जगासमोर उघड झाले आहे.
Source link