![]()
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजप आणि शिंदेसेनेकडून सर्वाधिक अर्ज दाखल आहेत. त्यामुळे अर्ज छाननीनंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांतच ओढाताण होण्याची चिन्हे आहेत. मागील दोन दिवसांत या निवडणुकीसाठी भाजपकडून मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिंदेसेनेकडून आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर, दिनेशसिंह परदेशी, काँग्रेसकडून खासदार डॉ. कल्याण काळे, जगन्नाथ काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शुक्रवारी (५ जून) शेवटच्या दिवशी पालकमंत्री संजय शिरसाट, त्यांची मुलगी हर्षदा शिरसाट, आमदार अनुराधा चव्हाण, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरनारे, आमदार अंबादास दानवे, देवयानी पाटील डोणगावकर, सुहास सिरसाठ, रामराव शेळके, अभिजित देशमुख या सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नितीन पाटील यांचे पुत्र अर्जुन पाटील, निशांत पाटील तसेच एकनाथ जाधव, राजू भुमरे, माजी अध्यक्ष अर्जुन गाढे, अर्चना नितीन पाटील यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. मात्र, या निवडणुकीतील लढतीचे खरे चित्र सोमवारी अर्ज छाननीनंतर स्पष्ट होणार आहे. शेवटच्या दिवशी १३७ उमेदवारांचे अर्ज दाखल जिल्हाभरातून दिवसभरात १३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १०, तिसऱ्या दिवशी ६७ अर्ज दाखल झाले. असे एकूण २१४ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी दिली.
Source link
जिल्हा बँकेच्या आखाड्यात सर्वपक्षीय दिग्गज:उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुतीत रंगणार ओढाताण