![]()
अमरावती जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय घेतला आहे. अमरावती जिल्हा परिषदेतील कर्मचारी त्यांचे एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार आहेत. संघटनेचे कार्याध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा एक भाग आहे. अमरावतीसह राज्यभरातील सर्व लिपीकवर्गीय कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून देणार आहेत. जून २०२६ पासून पावसाचा खंड पडल्याने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या गंभीर संकटामुळे शेतकरी आणि शेतमजूर अडचणीत सापडले आहेत. या संकटात प्रशासनासोबत उभे राहण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांना पाठवण्यात आली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर, मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी, सचिव अरुण जोर्वेकर, कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनीही शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची भावना व्यक्त केली.
Source link
जि. प. कर्मचारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार एक दिवसाचे वेतन:अमरावतीसह राज्यभरातील लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय