Headlines

तिवसा येथे दुष्काळी परिस्थितीत चारा वाहतूक भोवली:10 लाखांचा 7 टन चारा जप्त, अमरावती जिल्ह्यात पहिलीच कारवाई, तिघांवर गुन्हा




अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी १० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमरावती जिल्ह्यात चारा वाहतुकीवर झालेली ही पहिलीच कारवाई आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे अमरावतीसह राज्यात चाराबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरांसाठी हिरवा, वाळलेला चारा, गवत आणि वैरण जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घातली आहे. पोलिसांनी एमएच ४६ एफ ६६९९ क्रमांकाचा ट्रक अडवून त्यातील ७ टन २७० किलो सोयाबीन कुटार जप्त केले. जप्त केलेल्या चाऱ्याची किंमत १५ हजार रुपये, तर ट्रकची किंमत १० लाख रुपये आहे. हा चारा खोलापूर येथून उमरेडमार्गे नागपूरला नेला जात होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय तोटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तिवसा पोलीस आणि महसूल विभागाने केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *