Headlines

14 वर्षीय मुलाचा शेतात अंत्यविधी:नांदुरा खुर्दला स्वातंत्र्याची 80 वर्षे उलटूनही स्मशानभूमी नाही, गावकऱ्यांमध्ये संताप




नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नांदुरा (खुर्द) गावात स्मशानभूमी नसल्याने एक गंभीर समस्या समोर आली आहे. स्वातंत्र्याची 80 वर्षे उलटूनही या गावाला हक्काची स्मशानभूमी मिळालेली नाही. यामुळे अथर्व गौतम गवई या 14 वर्षीय मुलाचा अंत्यविधी त्याच्या वडिलांच्या शेतात करावा लागला. अथर्वचा अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गावात अधिकृत स्मशानभूमी नसल्याने कुटुंबावर ही वेळ आली. या घटनेमुळे गावातील स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे यवतमाळ-वाशीम लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अंत्यविधीसाठी शेतात जाण्यासाठी रस्ताही नव्हता, तसेच रात्री अंधारातच अंत्यसंस्कार करावे लागले. गावकऱ्यांनी प्रश्न विचारला आहे की, इतर विकासकामांसाठी निधी मिळतो, मग स्मशानभूमीसाठी का नाही? भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा गंभीर प्रश्न आहे. पावसाळ्यात तर उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ येते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *