![]()
दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर येतो पणत्यांच्या वातींचा प्रकाश, दारासमोर काढलेली रंगीबेरंगी रांगोळी आणि तोंडाला पाणी आणणारा फराळाचा घमघमाट. पण या सगळ्या गोड सोहळ्यात खरा मान असतो तो दिवाळीच्या मिठाईचा. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत साखरेच्या पारंपारिक ला
.
शहरातील मुख्य बाजारपेठा जसे की माळीवाडा, तेली खुंट, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा आणि सावेडी उपनगरातील प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, गुलमोहोर रोड परिसरातील मिठाई दुकाने ग्राहकांच्या गर्दीने गजबजली आहेत. घरगुती फराळासोबतच नातेवाईक, मित्रपरिवार आणि व्यावसायिक भेट देण्यासाठी महागड्या व आकर्षक मिठाईची जोरदार खरेदी सुरू आहे. व्यापारी वर्ग, डॉक्टर, बिल्डर आणि मोठे व्यावसायिक आपल्या ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना देण्यासाठी ड्रायफ्रुट्सच्या महागड्या बॉक्सेसची खरेदी करत आहेत. नातेवाईकांमध्ये प्रेमाची देवाणघेवाण करण्यासाठी ५०० ग्रॅम ते २ किलोपर्यंतच्या आकर्षक पॅकेजिंगला पसंती दिली जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक मिठाईची खरेदी घरोघरी आवर्जून केली जात आहे.
ड्रायफ्रूट्स आणि ‘ड्राय सलाड’ मिठाईची जादू शाही ड्रायफ्रुट्स रोल आणि बर्फी : अंजीर रोल, खजूर मलाई, पिस्ता बास्केट, बदाम केशर कतली आणि काजू अक्रोड रोल यांना तुफान मागणी आहे. या मिठाईमध्ये साखरेचे प्रमाण अत्यंत कमी किंवा नसतेच, ज्यामुळे आरोग्याची काळजी घेणारा वर्ग याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे. ड्राय सलाड मिठाई : ही यंदाच्या बाजारातील नवीन आणि प्रीमियम व्हरायटी आहे. यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि निरनिराळ्या बेरींचे बारीक तुकडे किंवा सलाद स्टाइल मिश्रणाचा वापर केला जातो.
बजेटपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य ^यंदा ग्राहकांचा कल केवळ चवीपेक्षा आरोग्याकडे आणि प्रेझेंटेशनकडे अधिक आहे. आमच्याकडे साखरेची मिठाई मागणाऱ्यांपेक्षा खजूर-अंजीर रोल, ड्रायफ्रुट्स बास्केट आणि खास सलाड स्टाईल मिठाई खरेदी करणारा मोठा वर्ग पाहायला मिळत आहे. महाग असली तरी लोक बजेटपेक्षा गुणवत्तेला आणि पॅकेजिंगला प्राधान्य देत आहेत. – गोविंद जोशी, मिठाई व्यावसायिक.