Headlines

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तडीपार गुंडाला बेड्या:आरोपीकडून वलगावच्या बाजारपुरातून 32 इंची तलवार जप्त




वलगावमधील बाजारपुरा परिसरात तलवार घेऊन दहशत माजवणारे तडीपार गुंड शेख नजीम ऊर्फ कालू शेख नबी (वय ३०, रा. सतीनगर, वलगाव) याला वलगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३२ इंच लांबीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. रात्री १० वाजण्याच्या सुमारास शेख नजीम बाजारपुरा परिसरात तलवार घेऊन फिरत होता. तो नागरिकांना मारण्याची धमकी देत असल्याची माहिती वलगाव पोलिसांना मिळाली. त्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून स्वतःला घरात सुरक्षित ठेवले होते. माहिती मिळताच वलगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. आरोपी तडीपार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलम ४, २५, महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम १४२, १३५ आणि फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम १९३२ मधील कलम ७ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक पोलीस आयुक्त निलेश ब्राम्हणे आणि वलगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक आकाश वाठोरे, जमादार ईशय खांडे, पोलीस शिपाई सोनिनाथ घोलप, पंकज येवले, अजहर शेख आणि किरण पाठे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. मोर्शीत पोल्ट्रीफार्ममधून कोंबड्या चोरणाऱ्या दोघांना अटक मोर्शी पोलिसांनी पोल्ट्रीफार्ममधून कोंबड्या चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील मायवाडी शेतशिवारात झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *