Headlines

अमरावतीत 'लोकसंवाद' उपक्रमात नागरिकांच्या सूचना:मृद व जलसंधारण, रोजगार विभागाच्या योजनांची माहिती दिली; छोट्या गावांतही उपक्रम




अमरावती येथे ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा पहिला कार्यक्रम पार पडला. यात नागरिकांनी शासकीय योजनांना लोकसहभागाचे बळ देण्याची गरज व्यक्त केली. मृद व जलसंधारण तसेच कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाने त्यांच्या योजनांची माहिती दिली. हा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाने सुरू केला. शहरातील 99 वर्षांची परंपरा असलेल्या आझाद हिंद गणेशोत्सव मंडळात तो घेण्यात आला. गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना ‘लोकसंवाद’च्या माध्यमातून मृद व जलसंधारण विभागाचे धनंजय रोझे यांनी योजनांची माहिती दिली. नागरिकांनी या माहितीबद्दल समाधान व्यक्त केले. कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे आशिष येवले यांनी बेरोजगार तरुणांसाठीच्या रोजगार मेळाव्यांची माहिती दिली. दोन्ही विभागांची माहिती ऐकून नागरिकांनी आपली मते मांडली. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत असून, नागरिकांनी त्यात सहभागी होऊन या कार्याला बळ द्यावे, असे विचारही त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात योजनांची माहिती देण्यासोबतच नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शनही केले. माजी महापौर आणि आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष विलास इंगोले यांनीही आपले विचार मांडले. गणेशोत्सवात शासकीय योजनांची माहिती देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. मंडळाचे सचिव दीपक कलोती, सदस्य संजय मुचळंबे, प्रवीण चौधरी, अजय पुसतकर आणि राजेश ढोले यांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमाची सुरुवात आझाद हिंद गणेशोत्सव मंडळापासून झाली. दुसऱ्या दिवशी १७ सप्टेंबर रोजी रेवसा गावातील राजश्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळातही ‘लोकसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात कृषी विभाग आणि सहकार व पणन विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *