Headlines

शिवाजी शिक्षण संस्थेच्या गुणवंत पुरस्कारांचे वितरण:प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते सन्मानित केले




श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालयांमधील प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आले. अकोल्याच्या श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांच्यासह डॉ. पंकज नागपुरे, प्रा. गजानन भारसाकळे, डॉ. रुपाली इंगोले, मुख्याध्यापक डॉ. चत्रभुज कदम, डॉ. वैशाली देशमुख, नितीन कडू, डॉ. कांचन ठाकरे, अर्चना ढोबळे, हेमंत पाथ्रीकर आणि काही विद्यार्थी या पुरस्कारांचे मानकरी ठरले. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर, ॲड. जे.व्ही. पाटील पुसदेकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्रा. केशवराव गावंडे, सुरेशदादा खोटरे, प्रा. सुभाष बनसोड, सचिव डॉ. वि.गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य डॉ. अमोल महल्ले आणि विजय ठोकळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या मार्गदर्शनासोबतच पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. प्राचार्य अंबादास कुलट यांना स्व. पी.डी. चौधरी स्मरणार्थ उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पंकज नागपुरे आणि अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथील सहाय्यक प्राध्यापक गजानन भारसाकळे यांना स्व. बी.एस. उर्फ डॅडी देशमुख उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार मिळाला. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथील डॉ. रुपाली इंगोले यांना स्व. वनमालाताई कोहळे स्मृती उत्कृष्ट महिला प्राध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले. वरुड येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक डॉ. चत्रभुज कदम यांना स्व. हिरोजी उलेमाले स्मृती उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमरावतीच्या शिवाजी बहुउद्देशीय शाळेच्या शिक्षिका अर्चना ढोबळे यांना स्व. जुगलकिशोरजी अग्रवाल उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला, तर चांदूर रेल्वे येथील श्री मन्नालाल गुप्ता विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन कडू यांना उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून पुरस्कृत करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील राजंदा येथील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला माध्यमिक शाळा गुणवत्ता पुरस्कार देण्यात आला. शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका डॉ. कांचन ठाकरे यांना स्व. वनमालाताई कोहळे स्मृती उत्कृष्ट महिला शिक्षक, तर याच महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा सहाय्यक डॉ. वैशाली देशमुख यांना स्व. हिरोजी उलेमाले स्मृती उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने गौरवण्यात आले. राजंदा येथील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे हेमंत पाथ्रीकर यांनी शाळांमधील स्व. बी.एस. उर्फ डॅडी देशमुख उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार पटकावला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *