Headlines

पंतप्रधान मोदींच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य रांगोळी:76 दिवे पेटवून आणि 76 किलो पेढे वाटून आनंदोत्सव साजरा




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात खास सेलिब्रेशन करण्यात आले. रविवार पेठेतील संत नामदेव चौकात २० बाय २० फूट आकाराची भव्य रांगोळी काढण्यात आली. लोककल्याण प्रतिष्ठान, प्रल्हाद गवळी मित्र परिवार आणि भाजप पुणे शहर यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ७६ दिवे पेटवून आणि ७६ किलो पेढ्यांचे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संत नामदेव चौकात काढलेल्या या भव्य रांगोळीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रांगोळीतून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते. नागरिकांनी रांगोळीचे कौतुक केले आणि उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. ही रांगोळी पुढील पाच दिवस पुणेकरांना पाहता येणार आहे. या कार्यक्रमाला नगरसेवक राजेंद्र काकडे, भाजप राष्ट्रीय लीगल सेल कमिटीचे सदस्य ॲड. हिरसिंग राजपुरोहित, मंडल अध्यक्ष छगन बुलाखे, सरचिटणीस माधव साळुंके, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुनील खंडागळे, उपाध्यक्ष प्रशांत बढाई, अजय बढाई, विलास सिन्नरकर, साईनाथ चकोर, प्रशांत बल्ला, आदेश अवघडे, सोनाली थोपटे, विकास गवळी आणि विक्रम लगड हे उपस्थित होते. आयोजक प्रल्हाद गवळी यांनी सांगितले की, “वाढदिवसानिमित्त २० बाय २० फूट आकाराची रांगोळी काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ७६ दिवे पेटवून आणि ७६ किलो पेढे वाटून नागरिकांसोबत हा आनंद आणखी वाढला. वाढदिवस केवळ औपचारिक न ठेवता सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमातून साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचे प्रेम, सहकार्य आणि सहभाग यामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला.” त्यांनी ‘मूर्ती तुमची, किंमत तुमची’ या उपक्रमांतर्गत नुकतेच पाच हजार गणपती मूर्तींचे वाटप केल्याचेही सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *