Headlines

समाज कल्याण विभागात 'संकल्प दिवा' साकारला:पंतप्रधान मोदींच्या सेवापूर्तीनिमित्त 'सेवा संकल्प अभियान' सुरू; अमरावतीत 17 सप्टेंबर रोजी सुरुवात




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवापूर्तीनिमित्त राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाची सुरुवात १७ सप्टेंबर रोजी अमरावती येथील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात झाली. येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून ‘संकल्प दिवा’ साकारून अभियानाचा प्रारंभ केला. प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी या उपक्रमात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या अभियानांतर्गत अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या पाचही जिल्ह्यांमध्ये समाज कल्याण विभागाकडून विविध सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे घेऊन नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून दिला जाईल. शाळा आणि महाविद्यालयांमधून मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची माहिती गोळा करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जातील. अनाथालय आणि वृद्धाश्रमांना भेट देऊन तिथे उपलब्ध जागेत वृक्षारोपण केले जाईल. याशिवाय, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, प्लास्टिक मुक्ती जनजागृती, महिलांचे आरोग्य, वंचित मुलांसाठी शिक्षण सहकार्य आणि करिअर समुपदेशन यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणीही केली जाईल. शासन निर्णयानुसार, शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा आणि कार्यालयांमध्ये रांगोळी व मानवी साखळीद्वारे दिवा तयार केला जाईल. व्यसनमुक्तीवर व्याख्याने आयोजित केली जातील, तसेच उत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार केला जाईल. शाळांमध्ये “विकसित भारत – २०४७” आणि “मुलांच्या स्वप्नातील भारत” या विषयांवर स्पर्धा आणि प्रदर्शनेही आयोजित केली जातील. या अभियानांतर्गत, वेगवेगळ्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊनही दिवा प्रज्वलित केला जाणार आहे. समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी थेट लाभार्थ्यांकडे पोहोचून हे कार्य करतील. या ‘सेवा संकल्प अभियाना’चा उद्देश विभागातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचवणे हा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *