Headlines

मोर्शीत पोल्ट्रीफार्ममधून कोंबड्या चोरणाऱ्या दोघांना अटक:पोलिसांनी 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, एक आरोपी अजूनही फरार




मोर्शी पोलिसांनी पोल्ट्रीफार्ममधून कोंबड्या चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील मायवाडी शेतशिवारात झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे श्याम वासुदेवराव सुरजुसे (वय २५, रा. सुरळी, ता. वरूड) आणि मुकेश दिवाकर धुर्वे (वय २४, रा. कुरळी, ता. वरूड) अशी आहेत. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी विजय ज्ञानेश्वर उईके (रा. सुरळी, ता. वरूड) फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अशोक फकीरजी चौधरी (रा. दापोरी, ता. मोर्शी) यांनी ११ सप्टेंबर रोजी तक्रार दिली होती. त्यांच्या गोडाऊनचे कुलूप तोडून १० सप्टेंबरच्या रात्री ११ ते ११.३० वाजताच्या दरम्यान ६० कोंबड्या (अंदाजे २२ हजार रुपये किमतीच्या) चोरीला गेल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून आरोपींना शोधले. अटक केलेल्या आरोपींकडून ९ हजार १०० रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ४९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर, जमादार रुपेश गावंडे, शिपाई विवेक घोरमाडे, शांताराम सोनोने, शिवा शिरसाट आणि सायबर चालक प्रज्वल राऊत यांनी ही कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *