Headlines

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत योजनांचा आढावा:माजी महापौर किरण महल्ले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; दुर्गम भागातील नागरिकांना सुविधा देण्याचे निर्देश




राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्य आणि माजी महापौर किरण महल्ले यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय भवनात एक आढावा बैठक झाली. या बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी विकास आणि महिला व बालविकास विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष महल्ले यांनी सर्व सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले. चिखलदरा, मेळघाट, दिग्रस आणि दारव्हा यांसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना आधारकार्ड, रेशनकार्ड आणि जातीचा दाखला मिळावा यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले. विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील लोकांना रोजगारासाठी सतत स्थलांतर करावे लागते. यामुळे त्यांना जन्माचा दाखला मिळण्यात अडचणी येतात. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. या बैठकीला प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त ज्योती कडु, इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरिता बोबडे उपस्थित होत्या. तसेच, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील अनेक अधिकारी व कर्मचारीही हजर होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *