Headlines

गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिसांचीच लाचखोरी:20 हजार स्वीकारताना हवालदार सचिन तायडे अटकेत, शिपाई फरार




नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना पकडले आहे. एका अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. या प्रकरणी हवालदार सचिन मानिकराव तायडे (वय ४८, ब.नं. ५५३१) याला अटक करण्यात आली आहे, तर त्याचा साथीदार पोलीस शिपाई मनीष उत्तम मेश्राम (वय ३०) फरार आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका २३ वर्षीय तक्रारदाराविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार सचिन तायडे आणि शिपाई मनीष मेश्राम यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत नागपूर एसीबीकडे तक्रार केली. एसीबी पथकाने १६ सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता, दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर जरीपटका पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीने छापा टाकला. यावेळी हवालदार तायडेने कारवाईपासून वाचण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लाचेची रक्कम लपवण्याचा प्रयत्न केला. जरीपटका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *