![]()
पुण्यातील तुळशीबागेतील व्यापारी, कामगार आणि गजानन परिवाराच्या सहकार्याने नागरवस्ती भागातील वंचित मुलामुलींना नवीन कपडे देण्यात आले. श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. हॉटेल अगत्य येथे झालेल्या कार्यक्रमात मुलांसाठी अल्पोपाहाराचीही व्यवस्था होती. मंडळाचे अध्यक्ष सागर दहीभाते यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, पुणे पोलीस परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रचार विभाग प्रमुख अतुल अग्निहोत्री उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मुलांना कपडे देण्यात आले. २०१६ मध्ये छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा अकरावे वर्ष आहे. यंदाच्या कपडे वाटपाचा हा पहिला टप्पा असून, दिवाळीनंतर आणखी दोन टप्प्यांत गरजू मुलांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे ट्रस्टचे विश्वस्त सुनील उर्फ भाऊ दहीभाते यांनी सांगितले. त्यांनी उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सदस्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या नियोजनात मंडळाचे सदस्य आशिष शहा, अरविंद तांदळे, नरेश माळवे, रोहिणी हांडे, सुजाता गुळुमकर, अलका नवघिरे, कुमार कांबळे, शुभम गोरे, गणेश कदम, सिद्धार्थ सातपुते, प्रताप बिरादार आणि जयदीप ठेंगुरकर यांनी सहभाग घेतला. तुळशीबागेतील व्यापारी, कामगार आणि सदस्यांच्या सहकार्याने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. वस्तीतील आणि गरजू कुटुंबांतील मुलांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हा उपक्रमामागचा उद्देश आहे. काही मुलांच्या आई किंवा वडिलांचे निधन झाले आहे, तर काहींचे आई-वडील दोघेही नाहीत. मुलांची नावे आणि वयानुसार कपडे गोळा करण्याचे नियोजन गजानन परिवारातील सदस्यांनी केले.
Source link
तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी वंचित मुलांना कपडे दिले:श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्टचा उपक्रम; दिवाळीनंतर आणखी दोन टप्प्यांत मदत