![]()
दिल्ली ते पुणे विमान प्रवासादरम्यान विमानातून आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आणल्या प्रकरणी विमान प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खासगी विमान कंपनीतील कर्मचारी ओंकार विनोद कुलकर्णी (वय २८) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका प्रवाशाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता १२५, तसेच विमान अधिनियम २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३३ वर्षीय प्रवासी तरुणाला नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी तरुण पुणे जिल्ह्यातील सासवड परिसरात राहायला आहे. तो सोमवारी (२ नाेव्हेंबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दिल्ली-पुणे ते या मार्गावरील विमानाने प्रवास करत होता. आपत्कालीन परिस्थितीत विमानातून बाहेर पडण्यासाठी दरवाजा असतो. प्रवाशाने विमानातील कर्मचाऱ्यांची परवानगी न घेता आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आपत्कालीन परिस्थिती बाहेर पडण्याचा दरवाजा उघडण्याचे अधिकार विमानातील कर्मचाऱ्यांना असताना गुन्हा दाखल केलेल्या प्रवाशाने विमानातील अन्य प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत सांगितले आहे. सहायक पोलीस निरीक्षक एन शिरसाठ तपास करत आहेत. दुकानाचे कुलूप तोडून एक लाखांचे पितळी कडे चोरी दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांचे पितळी कडे चोरुन नेल्याची घटना गुरुवार पेठेत घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचे रविवार पेठेत धनलक्ष्मी मेटल्स हे भांडी विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानातील लोखंडी जाळी उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील पितळी कडे पोत्यात भरुन ठेवले होते. चोरट्यांनी दोन पोती चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार एस भोसले तपास करत आहेत.
Source link
दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला:सुरक्षितता धोक्यात आणल्याप्रकरणी गुन्हा; 33 वर्षीय प्रवाशाला पोलिसांची नोटीस