![]()
प्रतिनिधी | अकोला शहराचे तापमान २० दिवसांनी पुन्हा ४६ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असून यापूर्वी २७ एप्रिल रोजी ४६.३ सेल्सिअस तापामानाची नोंद करण्यात आली होती. एकीकडे रात्रीचा कमाल पाराही ३०.५ असल्याने उकाड्याने हैराण झालेले अकोलेकर शनिवारी रात्री उशिरा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने वैतागाने होते. जिल्ह्यात १७ मे २०२४ रोजी ४०.२ अंश सेल्सियस. १७ मे २०२५ रोजी ४० तर १७ मे २०२६ रोजी ४६.०० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे १७ मे रोजीचा पारा हा गत तीन वर्षांतील सर्वाधिक होता. यंदा तर अकोल्यात पारा मार्च महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतात सर्वाधिक होता.
Source link
दिवसभर उन्हाचा फटका; रात्री विजेचा खेळखंडोबा:अकाेल्याचे तापमान २० दिवसांनी पुन्हा पाेहाेचले ४६ अंश सेल्सियसपर्यंत