Headlines

नांदेडमध्ये 'मॅच फिक्स'चा आरोप:वडिलांच्या पक्षांतराच्या चर्चांदरम्यान कृष्णा पाटील म्हणाले – मी उद्धव ठाकरेंचाच सच्चा शिवसैनिक




ठाकरे गटातील राजकीय घडामोडींदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कृष्णा पाटील हे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव आहेत. आता स्वतः कृष्णा पाटील यांनी अधिकृत व्हिडिओ जारी करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी वडिलांच्या पक्षांतराच्या चर्चांवर बोलणे टाळले असून, केवळ स्वतःच्या राजकीय भूमिकेबाबत अत्यंत ठाम स्पष्टीकरण दिले आहे. नांदेडमध्ये ‘मॅच फिक्स’चा आरोप नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मोठा राजकीय सवाल उपस्थित केला आहे. पक्षाने सोशल मीडियावर पोस्ट करत “नांदेडमध्ये मॅच फिक्स आहे का?” असा थेट प्रश्न विचारला आहे. वंचितच्या पोस्टमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर शिंदेसेनेत जाण्याच्या चर्चेत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरीकडे, नांदेड विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेत आष्टीकर यांचे पुत्र आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचे वडील महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली असून, काँग्रेसच्या ९२ नगरसेवकांची मतं नेमकी कुणाला जाणार — कृष्णा पाटील, भाजप की वंचित बहुजन आघाडीला? असा सवाल वंचितने उपस्थित करत निवडणुकीच्या राजकारणात नवा वाद निर्माण केला आहे. उद्या मतदान आहे, म्हणूनच जाणीवपूर्वक माझ्यावर शंका – कृष्णा पाटील कृष्णा पाटील आष्टीकर यांनी सांगितले की, उद्या नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाचे मतदान पार पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून माझे सर्व मतदारांशी बोलणे सुरू आहे, मी याच निवडणुकीच्या घाईगडबडीत आणि प्रचारात व्यस्त आहे. मात्र, नेमकी हीच वेळ साधून गेल्या दोन दिवसांपासून माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि माझ्यावर शंका उपस्थित केली जात आहे. मी उद्धव ठाकरेंचाच सच्चा शिवसैनिक, मैदान सोडून जाणार नाही विरोधकांना कडक शब्दांत उत्तर देताना कृष्णा पाटील पुढे म्हणाले, विरोधकांना आमचे आव्हान आता पेलावत नाहीये. निवडणुकीत त्यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळेच ते माझ्यावर अशा शंका उपस्थित करत आहेत. मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना स्पष्ट करू इच्छितो की, मी कालही महाविकास आघाडीसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही आघाडीचाच राहणार! मी उद्धव ठाकरांचाच सच्चा शिवसैनिक आहे. आम्ही मैदान मारणारे गडी आहोत, मैदान सोडून पळून जाणारे गडी नाही. हिंगोली लोकसभेवर पुन्हा गद्दारीचा शिक्का?: नागेश आष्टीकरांच्या निर्णयाने विलास गुंडेवारांची आठवण ताजी
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे हिंगोली लोकसभेवर दुसऱ्यांदा गद्दारीचा शिक्का बसणार आहे. यापुर्वी तत्कालीन खासदार विलास गुंडेवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *