Headlines

नाशिकमधील कुंभमेळ्यात 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार होणार:संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले- मुख्यमंत्र्यांना खोटं बोलण्याची डिग्री द्यावी लागेल




नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीसह शहरातील रस्त्यांची अवस्था आणि कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला आणि मेळाव्याला नागरिकांनी बहिष्कार टाकल्याचा दावा करत, “९९ टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या,” असा आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. कुंभमेळ्यात २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार नाशिकमधील भ्रष्टाचारावर भाष्य करताना राऊत म्हणाले, “नाशिकमधला भ्रष्टाचार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च भ्रष्टाचार आहे, हे खुद्द मुख्यमंत्र्यांनाही माहीत आहे. कुंभमेळ्याच्या भ्रष्टाचारावर केवळ आम्हीच नाही, तर साधूसंतही टीका करत आहेत. कुंभमेळ्यासाठी जे ४५ हजार कोटींचे बजेट आहे, त्यातील तब्बल २५ हजार कोटी रुपये कुंभमेळा मंत्री आणि त्यांचे अधिकारी उडवणार आहेत, आणि याची सुरुवात आतापासूनच झाली आहे.” मुख्यमंत्री हवेतून उडत गेले का? शहरातील खड्ड्यांच्या समस्येवर संताप व्यक्त करताना राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला. “नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत १२ लोकांचे बळी गेले आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांना जनतेचा आक्रोश ऐकू येत नाही. मुख्यमंत्री काल हवेतून उडत गेले का? त्यांना रस्त्यावरील खड्डे दिसले नाहीत का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. साधारण १० वर्षांपूर्वी हे शहर दत्तक घेतले होते, तेव्हापासूनच या शहराची दुर्गती सुरू झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘तीन माकडांसारखी’ संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना महात्मा गांधींच्या तीन माकडांशी करत टीका केली. ते म्हणाले, “गांधींची माकडे सत्याच्या बाजूने होती. पण या मुख्यमंत्र्यांची माकडे ‘भ्रष्टाचार पाहणार नाही, भ्रष्टाचाराविषयी ऐकणार नाही आणि त्याविषयी तक्रार केली तर बोलणार नाही’ अशा अवस्थेत आहेत. हे सतत खोटे बोलतात. जशी मोदींना डिग्री मिळाली आहे, तशीच आता यांनाही खोटं बोलण्यासंदर्भात एक डिग्री द्यावी लागेल.” हेही वाचा.. कुंभमेळ्याच्या तयारीवर फडणवीसांचा मोठे विधान:नाशिककरांच्या सध्या शिव्या खाव्या लागतायत, पण कामं पूर्ण झाल्यावर हेच लोक हार घालतील; पृथ्वीराज चव्हाणांवरही पलटवार आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. एकाच वेळी शहरात अनेक विकासकामे सुरू असल्याने नाशिककरांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या शिव्याही खाव्या लागत आहेत, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. मात्र, ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर हेच लोक आपल्याला फुलांचे हार घालतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, कुंभमेळ्यातील कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही त्यांनी जोरदार पलटवार केला. नाशिकमध्ये आयोजित ‘सिंहस्थ महा कुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमात ते बोलत होते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *