Headlines

नेपाळमधील विध्वंसात वाचले घर:अनेक फूट पाणी आणि ढिगाऱ्याने वेढलेले; बाल्कनीत उभ्या 3 जणांचे वाचले प्राण; VIDEO




नेपाळमध्ये आलेल्या अचानक पुरामध्ये एक हिरव्या रंगाचे घर पाण्याच्या जोरदार प्रवाहातही अव्याहत उभे राहिले. आसपासचा परिसर उफाळलेल्या पाण्यात बुडाला. अनेक इमारती व ढिगारा वाहून जाताना दिसला. पण हे घर अखंड उभे राहिले. आता या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ नेपाळमधील कोणत्या ठिकाणचा आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. घराच्या बाल्कनीत 3 जम उभे असलेले दिसत आहेत. ते शांत दिसत आहेत. व्हिडिओत चिखलाचे पुराचे पाणी भयानक वेगाने परिसरात वाहत असल्याचे दिसत आहे. पाणी आपल्यासोबत इमारतींचे सांगाडे आणि ढिगारा वाहून नेत आहे. मात्र, चोहोबाजूंनी वेगाने वाहणाऱ्या पाण्याने वेढलेले असूनही, हे हिरव्या रंगाचे घर बऱ्याच अंशी सुरक्षित दिसले. पूर आणि ढिगाऱ्यात घर, छायाचित्रे… नेपाळमध्ये आतापर्यंत 579 मृत्यू नेपाळ पोलिसांनुसार, पुरात 579 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 2500 लोक बेपत्ता किंवा संपर्काबाहेर आहेत. यामध्ये 320 भारतीय नागरिकही समाविष्ट आहेत. शुक्रवारी असे समजले की इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपिसेट्टी देखील नेपाळला गेले होते. त्यांच्याशीही संपर्क होऊ शकलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, चीनमध्ये सुमारे 400 भारतीय अडकले आहेत, परंतु ते सर्व सुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षित मायदेशी परतण्यासाठी भारत चिनी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. याव्यतिरिक्त, 153 भारतीय चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *