![]()
पंडित जवाहरलाल नेहरू आणि वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने काँग्रेस भवनात अभिवादन केले. उल्हासदादा पवार, पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी आणि पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोघांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना उल्हासदादा पवार म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यादरम्यान नेहरू यांनी सुमारे ११ वर्षे तुरुंगवास भोगला. या काळात त्यांनी विपुल लेखन केले. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ आणि आत्मचरित्र ही त्यांची पुस्तके आहेत. नेहरू राजकीय नेते, साहित्यिक आणि विचारवंत होते, असे पवार म्हणाले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपली वैयक्तिक संपत्ती देशाला दिली. देशाच्या विकासाचा पाया त्यांनी रचला, असेही त्यांनी सांगितले. प्रचंड बहुमत असूनही नेहरू यांनी लोकशाही मूल्यांचे पालन केले. कुळ कायदा आणि जमीन सुधारणांमधून सामान्य माणसाला जमिनीचा मालकी हक्क मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आजच्या प्रगतीचा पाया त्यांच्या काळात उभारलेल्या संस्था आणि विकासाच्या धोरणांत आहे, असे पवार म्हणाले. लहुजी वस्ताद साळवे यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा आणि प्रशिक्षण दिले. वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य टिळक यांच्यावर त्यांच्या कार्याचा प्रभाव होता, असे पवार यांनी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींच्या आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी काम सुरू केले, तेव्हा त्यांना विरोध आणि त्रास सहन करावा लागला. त्या काळात लहुजी वस्ताद यांनी फुले यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना साथ दिली. सामाजिक परिवर्तन आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदानही पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, अविनाश बागवे, सचिन आडेकर, द. स. पोळेकर, सुरेश कांबळे, आबा जगताप, सुरेश नांगरे, विकास देशपांडे, वैशाली धिमधिमे, आदिती गायकवाड, विक्रम शहाणे, चेतन आगरवाल, हर्षद हांडे, मारुती माने, आशिष व्यवहारे, अजित ढोबळे, संदीप ताम्हणकर, अण्णा गोसावी, संजय मानकर आणि अरुण गायकवाड उपस्थित होते.
Source link
नेहरू आणि लहुजी वस्तादांना जयंतीनिमित्त अभिवादन:पुण्यात काँग्रेस भवनात कार्यक्रम; उल्हासदादा पवार यांनी दोघांच्या योगदानाची माहिती दिली