Headlines

पीएम किसानचे दोन, दुष्काळी मदतीचे पाच हजाराचे अनुदान अद्यापही मिळेना:मार्डीतील शेतकरी लाभापासून वंचित, फार्मर आयडी असूनही मदत नाही



शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत दिली जात असल्याचे चित्र सध्या रंगवले जात आहे. परंतु तिवसा तालुक्याच्या मार्डी परिसरातील अनेक शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित असल्याचे वास्तव समोर येत आहे. पीएम किसान

.

विशेष म्हणजे, संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक असलेली फार्मर आयडी नोंदणी तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तरीदेखील त्यांच्या खात्यात शासनाकडून मिळणारी मदत जमा झालेली नाही. त्यामुळे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही लाभ मिळत नसेल, तर शेतकऱ्यांनी नेमकी कोणती चूक केली, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. दिवाळी सण उलटून गेल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना पैशांची मोठी गरज असते. शेतीचा वाढता खर्च, बियाणे, खते, औषधे तसेच कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवताना शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून जाहीर झालेली मदत वेळेवर न मिळणे ही चिंतेची बाब ठरत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांकडून झालेल्या तांत्रिक चुका, कागदपत्रांमधील त्रुटी किंवा प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेच्या लाभापासून दूर राहत आहेत का, याची चौकशी करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान कृषी विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन मार्डी परिसरातील वंचित शेतकऱ्यांची लाभार्थीनिहाय तपासणी करावी. प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावीत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे दोन हजार रुपये व दुष्काळी सानुग्रह मदतीचे पाच हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.

जिल्ह्यात ३५,९९० शेतकरी वंचित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ई-केवायसी पूर्ण करूनही जिल्ह्यातील ३५ हजार ९९० शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. यामध्ये कुऱ्हा भागातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. दुसरीकडे ई-केवायसी पूर्ण केलेल्या ६५ हजार २१९ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला. परंतु १७ हजार ५०४ शेतकऱ्यांच्या लाभाबाबत तफावत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *