Headlines

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान:29 सप्टेंबरला अधिसूचना; 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार




महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघांसह राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होईल. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ४ अशी असेल. निवडणूक कार्यक्रमानुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर आहे. ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण होईल. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघांतर्गत येणाऱ्या संबंधित पाचही जिल्ह्यांमध्ये तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी लागू झालेली ही आचारसंहिता २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर संपेल. महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार पार पडेल. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
शहिद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सोमवारी कर्नल वसंत बल्लेवार यांचा विशेष सन्मान जम्मू काश्मिरमधील दहशतवादाविरुद्ध कारवाई, ऑपरेशन पराक्रम, कारगिल युद्ध, ऑपरेशन विजय यामध्ये सहभागी असलेले कर्नल वसंत बल्लेवार यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे शहिद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रम सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. बल्लेवार यांचा सन्मान एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘राष्ट्रभक्ती’ या विषयावर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात प्रभा सोनवणे, आश्र्लेशा महाजन, स्वप्नील पोरे, तनुजा चव्हाण, विजय सातपुते, विजया गुळवणी, आशा ठिपसे, स्वाती यादव, जयश्री श्रोत्रिय, अजय जोशी, सुजित कदम, उर्मिला वाणी यांचा सहभाग असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *