![]()
चेन्नईत गुलाब जामून, अहमदाबाद-जयपूरमध्ये सोन पापडी, बेंगळुरूत वडा आणि हैदाबादमध्ये कुरकुरीत चकोडीला खवय्यांनी पसंती दिली. मेणबत्त्या आणि झेंडूच्या फुलांच्या शोधात गेल्या वर्षाच्या तुलनेत 200% वाढ झाली असून गिफ्ट हॅम्पर्सची मागणी 300% पर्यंत वाढली आहे. पणत्या, दिव्यांच्या माळा, रांगोळीचे साहित्य आणि पूजेच्या वस्तूंना मोठी मागणी दिसून येत आहे. यंदाच्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ग्राहकांनी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे. घराची सजावट, पूजा विधी, धनत्रयोदशीची सोन्या-चांदीची नाणी, सणाचे खाद्यपदार्थ आणि नातेवाईकांसाठी भेटवस्तू अशा सर्वच गोष्टींची लोकांनी कशाला पसंती दिली हे इंस्टामार्टच्या आकडेवारीतून समोर आले आहे. धनत्रयोदशीची सोन्या-चांदी खरेदी धनत्रयोदशीच्या आधीच्या आठवड्यात सोन्याच्या नाण्यांच्या मागणीत 23 पट वाढ झाली असून 1 ग्रॅम आणि 0.5 ग्रॅमच्या नाण्यांना सर्वाधिक पसंती मिळाली. या खरेदीत बेंगळुरू शहर अव्वल स्थानावर राहिले, तर त्यापाठोपाठ हैदराबाद आणि मुंबईचा क्रमांक लागला. चांदीच्या नाण्यांच्या खरेदीत दिल्ली शहराने बाजी मारली. चांदीच्या नाण्यांची विक्री 7 पट वाढली असून 5 ग्रॅम व 10 ग्रॅमच्या लक्ष्मी-गणेशाची चित्रे असलेल्या नाण्यांना ग्राहकांनी प्राधान्य दिले. किचन आणि डायनिंगशी संबंधित वस्तूंच्या विक्रीत 45% वाढ झाली असून डिनर सेटची मागणी 344% आणि प्रेशर कुकरची विक्री 171% वाढली आहे. एका ग्राहकाने एकाच कार्टमधून 1 ग्रॅमची सोन्याची नाणी खरेदी करत ₹1.73 लाखांची ऑर्डर नोंदवली. बेंगळुरू आणि अहमदाबादमधील ग्राहकांनी 10 ग्रॅमची 24 कॅरेट सोन्याची नाणी खरेदी केली. वैयक्तिक खर्चाचा विचार करता नोएडामधील एका ग्राहकाने नऊ ऑर्डरद्वारे सोन्याच्या नाण्यांवर तब्बल ₹5 लाख खर्च केले, तर मुंबईतील ग्राहकाने ₹4.31 लाख आणि वारंगलमधील ग्राहकाने ₹3.86 लाख खर्च केले. सजावट, दिवे आणि मिठायांचा गोडवा सणासुदीच्या काळात फुलांच्या एकूण ऑर्डरमध्ये 42% वाढ नोंदवण्यात आली. मातीची पणती 45% तर LED पणत्यांची मागणी 88% वाढली आहे. सणातील मिठायांच्या विक्रीत 55% हून अधिक वाढ झाली असून लाडू, सोन पापडी, काजू कतली, गुलाब जामुन आणि पेढा यांना सर्वाधिक पसंती मिळाली. विविध शहरांमधील खाद्यसंस्कृतीची पसंती लाडू आणि काजू कतलीला देशभरात मागणी असली तरी प्रत्येक शहराची स्वतंत्र पसंती दिसून आली. चेन्नईमध्ये गुलाब जामुन आणि सीडई स्नॅकला पसंती मिळाली. अहमदाबाद आणि जयपूरमध्ये सोन पापडी सर्वाधिक विकली गेली, तर अहमदाबादमध्ये शेव-भेळ लोकप्रिय ठरली. बेंगळुरूमध्ये वडा आणि कोडुबळे, हैदराबादमध्ये चकोडी, कोची व तिरुवनंतपुरममध्ये फणसाचे चिप्स तर पुण्यात चिवडा आणि भाकरवडीला मोठी मागणी राहिली. आरोग्यदायी पर्यायांकडे वाढता कल पारंपरिक गोडधोडासोबतच आरोग्यदायी पदार्थांची खरेदी वाढली आहे. प्रोटीन चिप्स 239%, मिलेट आणि नाचणीचे स्नॅक्स 188% तर मखाना 52% वाढला आहे. याशिवाय साखरमुक्त मिठाई 71%, साखरमुक्त स्वीटनर्स 80% आणि साखरमुक्त कुकीजच्या ऑर्डरमध्ये 51% वाढ झाली आहे. कपडे, भेटवस्तू आणि मध्यरात्रीची खरेदी फुटवेअरच्या ऑर्डर 79%, बॅग व अॅक्सेसरीज 68% आणि कपड्यांची खरेदी 50% वाढली आहे. गिफ्ट रॅपिंग पेपर 78% आणि गिफ्ट बॅग 50% अधिक विकल्या गेल्या. नमकीन स्नॅक्स 56% आणि शीतपेयांच्या मागणीत 49% वाढ झाली आहे. मध्यरात्री 12 ते पहाटे 2 या वेळेतही खरेदीचा जोर दिसून आला. या काळात डेकोरेटिव्ह लाईट्स 903% आणि मेणबत्त्या 289% अधिक ऑर्डर केल्या गेल्या. पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी व्हिस्की ग्लासच्या मागणीत 136% वाढ झाली. मध्यरात्रीच्या खरेदीमध्ये कोला, चिप्स, चॉकलेट्स, ताजे दूध, इन्स्टंट नूडल्स आणि टिश्यू पेपरचा मोठा वाटा राहिला. 1 नोव्हेंबरपासूनच सुरू झालेला हा खरेदीचा उत्साह देशभरातील लहान-मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.
Source link
पुण्यात फक्त बाकरवडी:चेन्नईत गुलाब जामून, जयपूरमध्ये सोन पापडी आणि हैदाबादमध्ये कुरकुरीत चकोडीला खवय्यांची पसंती