![]()
पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तेल्हारा तालुक्यातील गोर्धा गावी जाऊन तेथील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठ्यासह अन्य अडचणींचा पाढा वाचला. पूर्ण क्षमतेने, वेळोवेळी, मुबलक प्रमाणात विद्युत पुरवठा झाल
.
पालकमंत्र्यांनी शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधला. दुष्काळाचे संकट उद्भवले आहे. मात्र या काळात शेतकरी बांधवांनी डगमगून जाऊ नये. राज्य शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. दुष्काळ लक्षात घेऊन शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये, म्हणून राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मदतीची वाट न पाहता तत्काळ अग्रीम मदत जाहीर केली आहे. वाटप सुरू आहे. यानंतर दुष्काळबाधितांसाठी आवश्यक मदत टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. राज्य शासन शेतकरी बांधवाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. पालकमंत्र्यांच्या हस्ते दिवाळी, पाडवा व भाऊबीज निमित्त गावातील शेतकरी, शेतमजूर महिला भगिनींचा फराळ व साडी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे, हिवरखेडच्या नगराध्यक्ष सुलभा दुतोंडे, तेल्हारा येथील नगराध्यक्ष वैशाली पालीवाल, संतोष शिवरकर, सरपंच भारती थोरात, ज्येष्ठ नागरिक विनायकराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर, महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते.