Headlines

लक्ष्मीपूजनासह मैदानांची पूजा; पाणी बचत, पर्यावरण संवर्धनाचा संकल्प:शिवाजी हायस्कूलमध्ये पणत्या लावून पाणी बचतीचा संदेश



दिवाळीत रोषणाई, पणत्यांचा प्रकाश आणि फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, सण साजरा करताना पर्यावरणाचेही भान असणे तेवढेच गरजेचे आहे. हाच संदेश देत स्थानिक रेल्वे परिसरातील श्री शिवाजी मराठा हायस्कूल स्टेशन ब्रँच येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येल

.

दिवाळीच्या निमित्ताने विद्यालयात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. यासोबतच ज्या मैदानावर विद्यार्थी खेळतात आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात, त्या मैदानाचीही पूजा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात खेळाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी मैदान स्वच्छ आणि सुरक्षित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे मैदानाचा वापर करताना त्याची स्वच्छता राखावी. मैदानाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. असे आवाहन यावेळी करण्यात आले. सणाच्या उत्साहात पर्यावरणाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी फटाक्यांचा वापर टाळण्याचा संदेशही देण्यात आला. फटाक्यांमुळे हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पशुपक्ष्यांवरही होतो. त्यामुळे फटाक्यांऐवजी पणत्या लावून आणि दिव्यांची रोषणाई करून दिवाळी साजरी करावी, असे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. पणत्यांच्या मंद प्रकाशाने संपूर्ण परिसर अतिशय सुंदर आणि शांत दिसत होता. यादरम्यानची लावण्यात आलेल्या दिव्यांची ही आरास लक्षवेधी ठरली.

फटाकेमुक्त दिवाळी: आरोग्यासाठी उत्तम पर्याय शिवाजी मराठा हायस्कूलने यंदा ”फटाकेमुक्त दिवाळी” साजरी करण्याचा निर्णय घेतला. फटाक्यांमुळे होणारे हवा आणि आवाजाचे प्रदूषण मानवाबरोबरच लहान मुले, वृद्ध आणि मुक्या पशू-पक्ष्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. हा धोका टाळण्यासाठी फटाके न फोडता मातीच्या पणत्यांच्या प्रकाशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.

पाणी वाचवा; थेंबथेंब अमूल्य दिवाळीच्या आनंदात पाण्याचे महत्त्व विसरू नये, याची आठवण करून देत यावेळी पाणी बचतीवर विशेष भर देण्यात आला. पाणी हा आपल्या जीवनाचा मुख्य आधार आहे. त्यामुळे त्याचा अपव्यय टाळणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. दैनंदिन पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा. नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये. जलसंवर्धनाची सवय स्वतःपासून लावून घ्यावी. असे विचार मांडण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *