Headlines

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान:शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील? 4 नियुक्त संचालकांची मते सीलबंद ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश




कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील आणि रणजीतसिंह पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. यामध्यो कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अतिरिक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या अध्यादेशावरून निर्माण झालेल्या कायदेशीर पेचावर औरंगाबाद खंडपीठाने अत्यंत महत्त्वाचा अंतरिम निर्णय दिला आहे. काय आहे उच्च न्यायालयाचा निर्णय? दिवाळीच्या सुट्टीत न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्यासमोर औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणावर तातडीची सुनावणी पार पडली. न्यायालयाने राज्य शासनाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, त्याचवेळी एक मध्यममार्ग काढत, शासनाने नामनिर्देशित केलेल्या ४ अतिरिक्त संचालकांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार दिला असला तरी, त्यांची मते एका स्वतंत्र मतपेटीत सीलबंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक प्रक्रिया कशी पार पडणार? आज मतदान होऊन निकाल जाहीर केला जाणार असला तरी, ही संपूर्ण प्रक्रिया २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीतील अंतिम निकालाच्या अधीन असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दिग्गज वकिलांचा युक्तिवाद या अत्यंत संवेदनशील प्रकरणात सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी तर शासनाकडून मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. “शासनाचा हा अध्यादेश सहकाराशी खेळ असून निवडणूक जुन्याच पद्धतीने व्हावी,” असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला. तर, “राज्यसभेत जर नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकतात, तर इथे का नाही?” असा प्रतिवाद रोहतगी यांनी केला. सुरुवातीला ही सुनावणी ऑनलाईन होणार होती, मात्र दोन्ही बाजूचे दिग्गज वकील समोरासमोर असल्याने न्यायालयाने प्रत्यक्ष कोर्टातच सुनावणी घेतली. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे आता २५ निर्वाचित सदस्यांचेच पारडे जड असल्याचे मानले जात असून, कोल्हापूरचे लक्ष आता आजच्या प्रत्यक्ष मतदानाकडे आणि निकालाकडे लागले आहे. ———— हेही वाचा.. गोकुळमधील सरकारी हस्तक्षेपाविरोधात कोल्हापुरात पायताण अन् जनावरांसह मोर्चा: तुम्ही सुरुवात केली, आम्ही संपवणार; 2029 मध्ये सत्ता उलटवू- सतेज पाटील

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक १० नोव्हेंबरला होत आहे. सोमवारी महायुतीच्या नेत्याची बैठक कोल्हापूर डीसीसी बँकेत पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाबाबत मोठी घोषणा केली. पत्रकार परिषद घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाबाबत मोठी घोषणा केली. या वेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली. गोकुळच्या अध्यक्षपदाचा निर्णय महायुतीचे नेतेच घेतील, अध्यक्ष कोण होणार हे आम्ही ठरवू, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. ‘गोकुळ’चा अध्यक्ष महायुतीचा होणार आहे. मात्र, अध्यक्ष कोण असणार याबाबत मंगळवारी सकाळी महायुतीच्या नेत्याची बैठक घेऊन नावाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी झालेल्या बैठकीला महायुतीमधील भाजप, शिवसेनेचे नेतेमंडळी उपस्थित होते. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी कुणाचे नाव जाहीर होते हे मंगळवारी कळणार आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *