![]()
गंगापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार व विनयभंग प्रकरणी अत्यंत जलद गतीने सुनावणी पूर्ण करत ऐतिहासिक निकाल दिला आहे. अवघ्या दोन महिन्यांत निकाल लावत न्यायालयाने आरोपी विजय मगन पारखे (४६, रा. वाहेगाव, ता. गंगापूर) याला दोषी ठरवून ७ वर्षे सश्रम कारावास आणि दंड अशी कडक शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश (१) राहुल आण्णासाहेब शिंदे यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा नोंद क्रमांक ३८२/२०२६ (विशेष खटला क्रमांक ५३/२०२६) अंतर्गत भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील आणि प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले गेले. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. कृष्णा एस. गंडे यांनी भक्कम युक्तिवाद मांडला व साक्षीदार तपासले. पोलीस अंमलदार ए. के. शेख (बॅच नं. १७४१) यांनी न्यायालयात प्रभावीपणे कोर्ट पैरवी केली. नुकसानभरपाई: एकूण दंडाच्या ३२,००० रक्कमेपैकी २५,००० पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Source link
पॉक्सोअंतर्गत गुन्ह्यात आरोपीला 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा:गंगापूर न्यायालयात अवघ्या दोन महिन्यांमध्येच लागला निकाल