Headlines

पोलिस चौकीसमोर ५० फुटांवर फोडले दुकान:पहाटे ४.३० वाजेची घटना : गस्तीवरील पाेलिसांचे पथक पुढे जाताच चाेरट्यांनी मारला डल्ला‎




प्रतिनिधी | जळगाव शनिपेठ आणि आसोदारोड परिसरात लाल रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने एकाच रात्रीत दोन दुकाने फोडली. शनिपेठ परिसरातील भिलपुरा पोलिस चौकीपासून अवघ्या ५० फुटांवर असलेले एक मेडिकल चोरट्यांनी फोडले. पहाटे चार वाजेपर्यंत पोलिस गस्तीवर होते. ते परतताच साडेचार वाजता चोरट्यांनी डल्ला मारला. यानंतर या टोळीने आसोदा रोडवरील एक हार्डवेअरचे दुकानही फोडले. दिलीप अनंत वाणी यांचे शनिपेठ भागातील शनीमंदिर समोरील पद्मालया मेडिकल नावाचे दुकान आहे. ते याच – उर्वरित पान ४ हार्डवेअर दुकानातून रोकड लांबवली ममुराबादच्या दिशेने पळालेली ही कार पुन्हा शहरात आली. आसोदा रेल्वे पुलाजवळ भूषण छाजेड यांचे पूर्णा हार्डवेअर आहे. ते अमळनेर गेले होते. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता त्यांनी मोबाइलवर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात तीन अनोळखी इसम दुकानात घुसल्याचे दिसले. त्यांनी तातडीने जळगावातील कामगार योगेश कोळी याला फोन करून दुकानात पाठवले. योगेश तिथे पोहोचेपर्यंत चोरट्यांनी तेथून ५ हजार रुपये लांबवले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *