![]()
सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर सध्या संसदेत चर्चा सुरू असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “संसदेत केवळ विधेयकावर बोलून चालणार नाही, तर त्यामागे झालेला भ्रष्टाचार आणि आंदोलकांवर, विशेषत: महिलांवर झालेले अत्याचार यावरही सविस्तर चर्चा झाली पाहिजे,” अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. तसेच, पोलिसांची दडपशाही आणि विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “केवळ विधेयकावर चर्चा नको, भ्रष्टाचारावर बोला” केंद्र सरकारकडून आणल्या जात असलेल्या ‘सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयका’वर खासदार अरविंद सावंत यांनी थेट शब्दांत आपली नाराजी आणि अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, “सध्या केवळ विधेयकावर बोलले जात आहे. पण, या विधेयकाच्या पलीकडे जाऊन जो खरा भ्रष्टाचार झाला आहे आणि ज्या पद्धतीचे अत्याचार झाले आहेत, त्यावर चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे.” पोलिसांची दडपशाही आणि ‘बुलडोझर’ची भाषा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर आणि महिलांवर झालेल्या कारवाईवरून सावंतांनी पोलिसांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले. “पोलिसांनी महिलांसोबत केलेले गैरवर्तन आणि त्यांच्या भूमिकेवर संसदेत चर्चा झालीच पाहिजे. आजच्या घडीलाही पोलीस बुलडोझर वापरण्याची आणि घरे पाडण्याची भाषा करत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे,” असा आरोप अरविंद सावंत यांनी केला. गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारवर अविश्वास पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली. “आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारकडून जे काही बोलले गेले आहे, ते प्रत्यक्षात कसे केले जाईल? किंवा ते गुन्हे खरंच मागे घेतले जातील का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे,” असे म्हणत अरविंद सावंत यांनी सरकारच्या आश्वासनांवर अविश्वास दर्शवला आहे. सविस्तर वाचा.. दावा- CJP आंदोलनात खुनाचे 101 आरोपी सहभागी होते: दिल्ली पोलीस म्हणाले- आंदोलनात 2873 गुन्हेगार सहभागी, यापैकी 989 जणांवर गंभीर गुन्हे दिल्ली पोलिसांनी दावा केला आहे की कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या निदर्शनात हत्येचे 101 आरोपी सहभागी झाले होते. निदर्शनात आलेल्या 2873 लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजेच गुन्हेगारी नोंद आढळली, ज्यात 989 लोकांवर गंभीर गुन्हे दाखल होते. त्यांची ओळख फेशियल रिकग्निशन सिस्टम (FRS) आणि इतर तांत्रिक माध्यमांद्वारे करण्यात आली. पोलिसांनी दावा केला आहे की निदर्शनात सहभागी झालेल्या लोकांमध्ये हत्या, लैंगिक अत्याचार, पॉक्सो, दरोडा यासह इतर गंभीर प्रकरणांतील आरोपी आहेत. सविस्तर वाचा
Source link
फक्त विधेयकावर नको, भ्रष्टाचार-महिलांवरील अत्याचारावरही चर्चा करा:पेपरफुटी कायद्यावरून खासदार अरविंद सावंतांचा सरकारवर घणाघात