Headlines

बायकोकडे आलास तर जिवंत सोडणार नाही;सासरच्या छळामुळे सुरक्षारक्षकाची आत्महत्या:सुरक्षारक्षक आत्महत्याप्रकरणी पत्नी, सासू-सासऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा



“बायकोकडे आलास तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशा सासरच्या मंडळींकडून आणि ठेकेदाराकडून मिळणाऱ्या थेट धमक्या, सततचा मानसिक व शारीरिक छळ यांना कंटाळून गोलवाडीतील एका सुरक्षारक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

.

याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात मदनची पत्नी, सासू-सासरे, ठेकेदारासह एकूण नऊ जणांविरुद्ध रविवारी (१ नोव्हेंबर) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोलवाडी परिसरात १८ ऑक्टोबर रोजी मदन गंगाधर घुगे (३३, मूळ रा. अंतरवाली खांडी, ता. पैठण) याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे पुढील तपास करत आहेत.

रोजगारासाठी शहरात बोलावून छळ

मदनचा विवाह मनीषा हिच्यासोबत झाला होता. सुरुवातीचे काही दिवस दोघे गावीच राहिले. त्यानंतर शहरात भरपूर काम मिळेल, असे सांगून मदनची सासू राहीबाई हिने या दोघांना गोलवाडी येथे बोलावून घेतले. मदन शहरात सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करू लागला. या दांपत्याला दोन वर्षांची मुलगी आहे. मात्र काही महिन्यांतच कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी मदनचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *