Headlines

Now the impact of storm Murasu; but the weather will remain dry during Diwali, sea storm on the east coast, western disturbance in the hilly areas


  • Marathi News
  • National
  • Now The Impact Of Storm Murasu; But The Weather Will Remain Dry During Diwali, Sea Storm On The East Coast, Western Disturbance In The Hilly Areas

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘मुरासू’ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. हे सोमवार मध्यरात्री ते मंगळवार पहाटेच्या दरम्यान नेल्लोर आणि नरसापूरच्या दरम्यान किनाऱ्याला धडकू शकते. एका आठवड्यात ‘अर्णब’ नंतर हे दुसरे समुद्री वादळ आहे. मुरासूचा अर्थ- युद्धाचे नगारे. याच्या प्रभावामुळे सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग १०० ते ११० किमी/तास असू शकतो.

किनाऱ्याला धडकल्यानंतर मुरासूचा प्रभाव वेगाने कमी होईल. याचा कालावधी अर्णबइतका मोठा नसेल. २४ तासांच्या आत परिस्थिती सामान्य होऊ लागेल. वादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्रातही पाऊस होईल. दुसरीकडे, एक पश्चिमी विक्षोभ उत्तरेकडील डोंगराळ भागाकडे सरकत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता आहे. उंच डोंगरांवर बर्फवृष्टी होईल. पण, चांगले संकेत हे आहेत की यानंतर तीन-चार दिवस देशभरात हवामान निरभ्र राहील. धनत्रयोदशी ते दिवाळीदरम्यान पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, उत्तरेकडील मैदानी राज्यांमध्ये कोरडे उत्तरेकडील वारे वाहिल्यामुळे रात्रीचे तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. दिवसाचे तापमान ३२ अंशांपर्यंत राहील.

… समुद्राच्या उष्णतेमुळे निर्माण होते वादळ; पण त्याचा धोका जमिनीपर्यंत पोहोचतो

चक्रीवादळ उष्ण समुद्रावर तयार होते. समुद्रातून बाष्प घेऊन उष्ण हवा वर उठते आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण करते. बाष्पाचे ढग तयार होताना बाहेर पडणारी उष्णता वादळाला ऊर्जा देते. पृथ्वीच्या परिवलनामुळे वारे चक्राकार फिरतात. किनारा ओलांडल्यावर समुद्रातून ऊर्जा मिळणे कमी होते व वादळ कमकुवत होते, पण मुसळधार पाऊस आणि पुराचा धोका कायम राहू शकतो.

पूर्व किनारा सज्ज… पावसामुळे १९ उड्डाणे रद्द, हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

पूर्व किनाऱ्यावरील राज्ये एका आठवड्यात दुसऱ्या गंभीर चक्रीवादळात सापडली आहेत. आंध्र प्रदेशच्या तीन विमानतळांवरून १९ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. चेन्नईमध्ये शाळा बंद केल्या. तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तामिळनाडूने आंध्रच्या मदतीसाठी ९० एनडीआरएफ जवान आणि वीज विभागाचे ५०० कर्मचारी पाठवले आहेत. अर्णबमुळे नुकसान झालेल्या वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कर्नाटकही ५०० हून अधिक वीज कर्मचारी पाठवणार आहे. दुसरीकडे, ओडिशात संवेदनशील भागातून लोकांना हलवले जात आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेज बंद आहेत. भूस्खलनात बेपत्ता १० लोकांचा शोध सुरू आहे. ३०० हून अधिक बचाव पथके सज्ज आहेत. अर्णब-पुरामुळे १.१८ लाख लोक प्रभावित झाले, १,६७२ घरांचे नुकसान झाले आणि ७५,३८८ हेक्टर पिकांचे क्षेत्र बाधित झाले.

मराठवाडा, विदर्भात पुढील २ दिवस पाऊस

प्रतिनिधी. पुणे | ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे दक्षिण मराठवाडा, तळकोकण आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुण्यासह अनेक जिल्ह्यांना भरहिवाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. पुढील ४८ तास राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. सध्या पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे.

पाणीसाठ्यात थोडी वाढ होईल

पुण्यात सोमवारी पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू होती. रेनकोट आणि छत्र्या घेऊनच नागरिकांना घराबाहेर पडावे लागले. या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्यात ढगांची दाटी

  • रविवारी धाराशिव, अहिल्यानगर, बीड, लातूर आदी जिल्ह्यांत काही भागात पावसाने हजेरी लावली होती. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार मंगळवार आणि बुधवारी मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यां विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे.
  • वादळ धडकल्यानंतर बाधित भागात ४ नोव्हें. सकाळपर्यंत वेगवान वारे आणि पावसाचा प्रभाव राहील.स्टॉर्म सर्जचीही शक्यता आहे. यात समुद्राचे पाणी सामान्य भरतीवर उठते.
  • दक्षिणेकडील भागात शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान होण्याची खूप जास्त शक्यता वर्तवण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *