![]()
मंगळवेढा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील प्रलंबित कामे, कामकाजातील अनियमितता, खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेप, अतिरिक्त शुल्क आकारणी आणि विकासकामांना होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. १५) कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. खाजगी व्यक्तींचा हस्तक्षेप: शासकीय कामकाजात खाजगी व्यक्तींचा अनधिकृत हस्तक्षेप होत असून, त्यांना बसण्याची परवानगी कोणी दिली, याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. मोजणी प्रक्रियेसाठी ई-सेवा केंद्राद्वारे सुमारे १,५०० रुपये आकारले जात असून, चलन भरतानाही निर्धारित शुल्काव्यतिरिक्त ३० ते ४० रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत. याची कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. विकासकामांना व पांदण रस्त्यांना विलंब: नगरपालिकेच्या विकासकामांच्या अर्जांवर वेळेत कार्यवाही होत नाही. तसेच निधी उपलब्ध असतानाही पांदण रस्त्याची मोजणी प्रलंबित असल्यामुळे कामात आंदोलनादरम्यान प्रशासनाचे आश्वासन आणि बैठकीचे नियोजन आंदोलनादरम्यान नगरसेवक अजित जगताप यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मगर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व समस्यांची माहिती दिली. यावर श्री. मगर यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता मंगळवेढ्यात येऊन प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन, तर प्रांताधिकारी बी. आर. माळी यांनीही या बैठकीला दुजोरा दिला. आश्वासने कृतीत उतरावीत “हे आंदोलन कोणाविरोधात नसून, भूमी अभिलेख कार्यालयातील अनियमितता दूर करून सर्वसामान नागरिकांची कामे वेळेत आणि पारदर्शकपणे व्हावीत, यासाठी आहे. प्रशासनाने दिलेली आश्वासने आता प्रत्यक्ष कृतीत उतरावीत.” -अजित जगताप, नगरसेवक, मंगळवेढा
Source link
मंगळवेढा मोजणी कार्यालयाविरोधात आंदोलन:तोतया कर्मचाऱ्याचा वावर, दहा दिवसांत प्रलंबित कामे पूर्ण करण्याची उपअधीक्षक तांगडे यांची ग्वाही