Headlines

मतदारांना गृहीत धरणाऱ्या प्रस्थापितांना चपराक!:मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील विजयाच्या उंबरठ्यावर




“प्रस्थापित सत्ताधारी किंवा नेत्यांनी मतदारांना गृहीत धरले की जनता काय चमत्कार घडवू शकते, हे या निकालाने दाखवून दिले आहे. मराठवाड्यातील सुशिक्षित पदवीधरांनी लोकशाहीवर अढळ निष्ठा दाखवत ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली होती. विरोधकांची संस्थात्मक ताकद आणि यंत्रणा असूनही महाविकास आघाडीची एकजूट, सकारात्मक विकासाचा जाहीरनामा आणि जमिनीवरील अचूक नियोजनामुळेच हा ऐतिहासिक कौल मिळाला आहे,” असा ठाम आणि रोखठोक विश्वास महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सुरुवातीपासूनच एकतर्फी वर्चस्व राखले आहे. पहिल्या पसंतीक्रमात तब्बल ७३,९३१ मते घेतल्यानंतर आणि तिसऱ्या फेरीअखेर १३,१६३ मतांची भक्कम आघाडी गाठल्यानंतर डॉ. पाटील यांचा विजय आता केवळ औपचारिक उरल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या पसंतीक्रमात ७३,९३१ मते मतमोजणी केंद्राबाहेर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. प्रतापसिंह पाटील म्हणाले, “दुसऱ्या फेरीअखेर ११,००० ते १२,००० मतांची आघाडी होती, तर तिसऱ्या फेरीअखेर ही आघाडी तब्बल १३,१६३ मतांवर पोहोचली. पहिल्या पसंतीक्रमात आम्हाला ७३,९३१ मते मिळाली आहेत. विजयासाठी आवश्यक कोटा गाठण्याकरता आता दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू असून आम्ही विजयाच्या अगदी उंबरठ्यावर उभे आहोत. मतमोजणीच्या प्रक्रियेतील सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर साधारणतः सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत अंतिम निकालाचे अधिकृत चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. मात्र, महाविकास आघाडीचा हा विजय १००% निश्चित आहे.” 8 जिल्हे, 76 तालुके अन् शरद पवारांची रणनीती माजी आमदारांचे संस्थात्मक जाळे आणि गेल्या 3 ते 4 वर्षांची तयारी असतानाही मिळालेल्या या मोठ्या आघाडीमागील गमक स्पष्ट करताना डॉ. पाटील यांनी चार प्रमुख मुद्दे अधोरेखित केले. पदवीधर मतदारांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता मतपेटीतून आपला स्वाभिमान सिद्ध केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी अगदी बूथ आणि गावपातळीवर खांद्याला खांदा लावून प्रामाणिक काम केले. पुढील 6 वर्षांचे व्हिजन डॉक्युमेंट “आम्हाला पुढील 6 वर्षांसाठी संधी दिल्यास पदवीधरांचे प्रश्न कसे सोडवणार, याचा सविस्तर आणि सकारात्मक कृती कार्यक्रम आम्ही मांडला. पदवीधरांच्या हाताला रोजगार कसा देणार, मराठवाड्यात स्टार्टअप्स आणि उद्योगांना कशी चालना देणार, याचा रोडमॅप मतदारांना पूर्णपणे पटला.” परफेक्ट आणि सूक्ष्म नियोजन “आमच्या कुटुंबात स्वतः ६ डॉक्टर्स आहेत. रुग्णांच्या आणि जनसामान्यांच्या संपर्काची आम्हाला पूर्वापार सवय आहे. अत्यंत कमी कालावधीत मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि ७६ तालुके पिंजून काढत केलेले अचूक नियोजन निर्णायक ठरले.” सुशिक्षित पदवीधरांनी निवडणूक हातात घेतली प्रचाराच्या पद्धतीवर बोलताना त्यांनी विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. प्रचारादरम्यान कोणत्याही राजकीय विरोधकावर वैयक्तिक किंवा खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक केली नाही. केवळ पदवीधरांचे आर्थिक स्थैर्य आणि सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न यावरच भर दिला. गृहीत धरणाऱ्यांना धडा “मतदारांना कायम गृहीत धरून चालणाऱ्या नेत्यांना जनतेने जागा दाखवून दिली आहे. २३ तारखेला पदवीधरांनी मतदान केले आणि आज २७-२८ तारखेला त्याचा निकाल सर्वांसमोर आहे,” असे सांगत डॉ. पाटील यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मोठ्या आघाडीनंतर मतमोजणी केंद्राबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष सुरू केला आहे. ———————————————- हेही वाचा… प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी ठाणे पोलिसांची मोठी माहिती: आतापर्यंत 5 आरोपींना अटक; कायदा हातात घेणाऱ्यांनाही कारवाईचा इशारा ठाण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पूर्णेकरांच्या हत्येनंतर ठाण्यात चांगलेच वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तर शिंदे गटाने देखील याला पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आज ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद आयोजित करत तपासासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *