![]()
विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून, निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी आपल्या विजयाचा भक्कम विश्वास व्यक्त केला आहे. “आमचे परफेक्ट नियोजन होते आणि कार्यक्रम करेक्ट झालेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपणच आमदार होणार,” असा मोठा दावा पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ‘निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती’ प्रतापसिंह पाटील यांनी मतदारांचे आभार मानले. “आमचे नियोजन अतिशय अचूक होते. ही निवडणूक आम्ही नाही, तर थेट आम जनतेने आणि सर्व मतदारसंघांतील पदवीधरांनीच हातात घेतली होती. त्यामुळे आमच्यासाठी ही निवडणूक अतिशय सोपी गेली. सर्वांनी आम्हाला भरभरून पाठिंबा दिला आहे,” असे ते म्हणाले. ‘कॅंडिडेट आवडला म्हणून मतदान’ आपल्या उमेदवारीबद्दल बोलताना ते म्हणाले, “पहिल्या दिवसापासूनच सगळ्या लोकांनी मला पाठिंबा दिला, कारण त्यांना उमेदवार आवडला. लोकशाहीत मतदानाला सर्वात जास्त महत्त्व असते. पदवीधरांनी केवळ पक्षावर नाही, तर लोकशाहीवर निष्ठा ठेवून विचारपूर्वक मला मतदान केले आहे.” ‘सहा वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल’ मतमोजणीच्या निकालाबाबत उत्सुकता वाढवताना पाटील म्हणाले, “उमेदवार आवडला म्हणूनच मला मतदान झाले आहे. लोकशाहीवर निष्ठा ठेवून हे काम झाले आहे. आता तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, सायंकाळी सहा वाजेपर्यंत निकाल काय आहे, ते सर्वांना कळेलच.” मराठवाड्यातील तिरंगी लढत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची आणि तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. महायुतीकडून सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) नशीब आजमावत आहेत. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांच्या उमेदवारीमुळे ही लढत अधिकच रंजक झाली आहे. कुणाला फटका बसणार आणि प्रतापसिंह पाटील यांचा दावा खरा ठरणार का, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. मतमोजणीसाठी 70 टेबलांवर 13 फेऱ्यांचे नियोजन, पाहा फोटो.. ————————– हेही वाचा.. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणी: महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी? पुण्यात मतपेट्यांच्या सीलवरून गोंधळ
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या चुरशीच्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत पहिले कल हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली असून, कुणाला धक्का बसणार आणि कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा
Source link
मराठवाडा पदवीधर निवडणूक:प्रतापसिंह पाटलांचा मोठा दावा, म्हणाले- परफेक्ट नियोजन अन् करेक्ट कार्यक्रम झालाय, आपणच जिंकणार