शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता मोठी राजकीय आणि कायदेशीर घडामोड समोर आली आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) न
.
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी सुरुवातीपासूनच या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र उर्फ राजा शिंदे यांचा थेट हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांची आतापर्यंत 7 वेळा मिळून तब्बल 50 तासांहून अधिक वेळ मॅरेथॉन चौकशी केली आहे. पतीच्या दीर्घ चौकशीनंतर आता स्वतः मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
26 दिवस उलटले तरी न्याय नाही; मुलाचा संताप
वडिलांच्या हत्येनंतर आज राम पूर्णेकर यांनी कुटुंबीयांसह पत्रकार परिषद घेऊन तपास यंत्रणांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “वडिलांच्या हत्येला आज 26 दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र तरीही आम्हाला न्याय मिळालेला नाही. पालकमंत्र्यांनी केवळ फोनवरून आश्वासने दिली, परंतु प्रत्यक्ष कृती काहीच झालेली नाही. हत्येचा कट रचणाऱ्या दोघा नवरा-बायकोला (मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे) पोलिसांनी अद्याप अटक का केली नाही?” असा थेट सवाल राम पूर्णेकर यांनी विचारला. न्याय मिळवण्यासाठी राम पूर्णेकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन सखोल व निष्पक्ष तपासाची मागणी केली होती.
सीसीटीव्ही फुटेजचा नवा दावा- हेल्मेट घालून आलेला व्यक्ती राजा शिंदेच!
पत्रकार परिषदेत राम पूर्णेकर यांनी एक महत्त्वाचा व्हिडिओ पुरावा समोर आणत खळबळजनक दावा केला. तपासात मदत करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचे विशेष आभार मानत राम पूर्णेकर म्हणाले की, घटनास्थळावरून हेल्मेट घालून जाणारा संशयित व्यक्ती दुसरा कोणी नसून स्वतः राजा शिंदे असल्याचे स्पष्ट करणारा एक व्हिडिओ पोलिसांकडून समोर आला आहे.
आरोपींचे लागेबांधे उघड
“प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी नितेश पवार, राजा शिंदे, टल्ली आणि पप्प्या शिंदे हे सर्वजण एकाच व्हिडिओमध्ये एकत्र दिसत आहेत. यावरून हत्येचा कट कसा आणि कोणी रचला, हे सिद्ध होत असून पोलिसांनी आता विलंब न करता कठोर कारवाई करावी,” असा दावा पूर्णेकर यांनी केला.
29 सप्टेंबरला झाली होती हत्या
ठाण्यातील मानपाडा भागात 29 सप्टेंबर रोजी ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्य आणि स्थानिक वादातून ही हत्या झाल्याचा आरोप सुरुवातीपासून केला जात आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक करत असून, राजेंद्र शिंदे यांच्या 50 तासांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे उद्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते आणि पोलिसांकडून अटकेची कारवाई होते का, याकडे संपूर्ण ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
भयमुक्त ठाण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलनाची हाक
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेविरोधात विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. “ठाणे क्राईम कॅपिटल?” असा सवाल उपस्थित करत शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत आंदोलनाची घोषणा केली आहे.
“प्रदीप पूर्णेकर यांना न्याय द्या, आता एकच ध्यास, ‘भयमुक्त ठाणे’ आमचा श्वास!” या टॅगलाईनखाली ठाण्यात भव्य मोर्चा आणि निदर्शने करण्यात येणार असून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासन आणि प्रशासनावर दबाव वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
—————————————–
हेही वाचा…
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा दावा: राजेंद्र शिंदे आरोपींसोबत असल्याचे फोटो-व्हिडिओ पोलिसांना दिल्याचा राम पूर्णेकरांचा दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजेंद्र शिंदे हे आरोपींसोबत असल्याचे दर्शवणारे काही फोटो आणि व्हिडिओ आपल्याकडे असून ते पोलिसांकडे सादर केल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला आहे. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. येथे वाचा संपूर्ण बातमी