Headlines

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती!:उच्च शिक्षण संचालनालयाचे सर्व कॉलेजला आदेश




राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणार असून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदल केले जाणार असून १६ प्रकारच्या शैक्षणिक लाभांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क आणि कॅपनंतरच्या प्रवेशांनाही सवलती मिळणार आहेत. यातून उच्च शिक्षणासाठी दिलासा मिळेल. असा होणार फायदा शालांत परीक्षाेत्तर शिष्यवृत्ती योजना लागू होईल.
मान्यताप्राप्त शासकीय, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना फी माफी व शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती दिली जाईल.
‘कॅप’ फेरीनंतर संस्थास्तरावर रिक्त जागांवर सवलती मिळतील.
खाजगी, शासकीय आयटीआयमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळेल.
महाडीबीटी पोर्टलला शिष्यवृत्तीचा अर्ज थेट ऑनलाइन, वेळेत सादर करता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *