Headlines

मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही:केबल सेनेचे पद मिळाले, पक्षाशी संबंध नाही, एमआयएम नगरसेविकेचे वडील युनूस शेख यांची स्पष्टोक्ती




मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही अखिल भारतीय केबल सेनेचे कळवा-मुंब्रा विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. माझा जो फोटो व्हायरल होत आहे त्यांचा आणि शिवसेना प्रवेशाचा काही संबंध नाही. हे आमच्या उद्योगाशी संबंधित संघटना आहे, गेली 40 वर्षे आम्ही केबल उद्योग करत आहोत आता त्यामध्ये इंटरनेट सुविधा सुद्धा देण्यात येते. अनेक वर्षांपासून मी या संघटनेसोबत जोडला गेलेलो आहे याचा अर्थ असा नाही की शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे युनूस शेख यांनी म्हटले आहे. युनुस शेख यांचा शिवसेनेत प्रवेश करतानाचा फोटो समोर आला आहे. यामध्ये पक्षाचे पदाधिकारी त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र देताना दिसत आहेत. युनुस शेख यांची शिंदे सेनेच्या ‘कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्ष’ पदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचा उल्लेख या पत्रात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर सहर शेख हिचे ‘कैसा हराया…’ हे विधान आणि संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते जितेंद्र आव्हाडांशी वाद युनुस शेख हे एकेकाळी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक मानले जात होते. मात्र, नंतरच्या काळात दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. ठाणे महापालिका निवडणुकीत युनुस शेख यांनी आपल्या मुलीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. परंतु, उमेदवारी नाकारल्यामुळे सहर शेख हिने एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. विजयी सभेत बोलताना युनुस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर थेट निशाणा साधला होता. मी आव्हाडांना जीजी नाव दिले आणि ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. अल्लाहने माझ्या मुलीला हिजाबवाली बेटी म्हणून ओळख दिली. तू माझ्या मुलीला उमेदवारी नाकारलीस, पण मी तिला एमआयएमकडून निवडून आणले, असे म्हणत त्यांनी आव्हाडांना थेट आव्हान दिले होते. हे ही वृत्त वाचा विदेशी नागरिकांना भारतात आंदोलनाचा अधिकार नाही:भारतात अराजकता पसरवण्याचे विदेशी षडयंत्र, इम्रान खान प्रकरणावरून भाजप नेत्यांचा घणाघात

इम्रान खान हा विदेशी नागरिक आहे त्याला भारत सोडून जावेच लागेल,आमच्या देशात होणाऱ्या आंदोलनाशी त्यांचा काय संबंध आहे.सीजेपीवाले जी अराजकता पसरवत आहेत त्यांचा आणि यांचा काय संबंध आहे असा सवाल कदम यांनी केला आहे. हे सर्व ठरवून होत आहे. हा दिपके अमेरिकेला जातो काय तिथून परत येतो काय? आणि त्यानंतर लगेच अराजकता पसरवली जाते. त्यांच्या या आंदोलनात भाग कोण घेत आहेत तर विदेशी नागरिक, असे म्हणत भाजप नेते राम कदम यांनी अभिनेते इम्रान खान यांना भारत सोडून जाण्याच्या नोटीशीवर बोलताना म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *