Headlines

मुत्सद्देगिरी:फ्रान्ससोबत 12 करार शक्य; राफेलचा सोर्स कोड घेण्यावरही होणार चर्चा, सव्वातीन लाख कोटींचा करार, दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ घेणार निर्णय


  • Marathi News
  • National
  • 12 Agreements Possible With France; Discussions Will Also Be Held On Getting Rafale Source Code, Agreement Worth Rs 3.25 Lakh Crore, Cabinet Will Take Decision After The Visit

मुकेश कौशिक | नवी दिल्ली1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

६ दिवसांच्या परदेश दौऱ्यात पंतप्रधान मोदी दोनदा फ्रान्सला पोहोचतील. ते फ्रान्समधील नीस, इव्हियन आणि पॅरिस या ३ शहरांना भेट देतील. नीसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनसोबत बैठक होईल. दोन्ही देशांत १२ करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वात महत्त्वाची चर्चा हवाई दलासाठी सव्वातीन लाख कोटींच्या ११४ राफेल लढाऊ विमानांच्या करारावर होईल. यात भारताला विमानांच्या संयुक्त विकासासोबतच तंत्रज्ञानाचे संपूर्ण हस्तांतरण हवे आहे. भारतीय गरजांनुसार राफेलवर क्षेपणास्त्रे तैनातीच्या सोर्स कोडवर भारत भूमिका स्पष्ट करेल. मोदी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने अद्याप या करारावर शिक्कामोर्तब केलेले नाही. या दौऱ्यातील निर्णयांनंतरच मंत्रिमंडळ समिती शिक्कामोर्तब करू शकते.

होर्मुझ संरक्षण आघाडीत भारताच्या सहभागावर निर्णय शक्य

या दौऱ्यात होर्मुझमधून जहाजांच्या वाहतुकीबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. ब्रिटनच्या नेतृत्वात एप्रिलमध्ये झालेल्या पॅरिस चर्चेत भारत सहभागी झाला होता. होर्मुझ खुले करण्याबाबत भारत एखाद्या देशाच्या पुढाकारावर आधारित सुरक्षा व्यवस्थेऐवजी संयुक्त राष्ट्रांच्या नियमांना अनुकूल असलेल्या बहुपक्षीय सुरक्षा व्यवस्थेच्या बाजूने आहे. अशा स्थितीत भारत फ्रान्स आणि ब्रिटनच्या पुढाकारासोबत पावले उचलू शकतो.

पंतप्रधान मोदी ६ दिवसांच्या फ्रान्स-स्लोव्हाकिया दौऱ्यावर; जी-७ परिषदेत घेणार ट्रम्प यांची भेट, व्यापार करारावरही होणार चर्चा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी फ्रान्स, स्लोव्हाकियाच्या ६ दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. ते जी-७ परिषदेतही सहभागी होतील. सलग आठव्या जी-७ परिषदेसाठी भारताला आमंत्रित केले. जागतिक मंचावर भारताच्या प्रतिष्ठेची पावती असल्याचे मोदी म्हणाले. रात्री ते फ्रान्समध्ये पोहोचताच त्यांचे भव्य स्वागत झाले.

राफेल ६०% स्वदेशी असावे व स्वदेशी शस्त्रे जोडण्याची मुभा असावी अशी भारताची इच्छा

  • १४ जूनला पंतप्रधान फ्रान्समधील नीस येथे ‘भारत इनोव्हेट्स’चे उद्घाटन करतील.
  • १४ ते १५ जूनला मोदी स्लोव्हाकियाला जातील. ब्रातिस्लाव्हामध्ये ते राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी, पंतप्रधान फिको यांची भेट घेतील. १९९३ मध्ये स्लोव्हाकियाला स्वातंत्र्यानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असेल. १६ ते १७ जून दरम्यान ते इव्हियन येथे जी-७ मध्ये सहभागी होतील. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ते भेट घेतील. दोन्ही नेत्यांत व्यापारावर चर्चा होईल.
  • १८ जूनला पॅरिस येथे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासह विवाटेक परिषदेत सहभाग.
  • ९० विमाने भारतात बनणार: हवाई दलासाठी येणाऱ्या ११४ राफेल लढाऊ विमानांपैकी केवळ २४ विमाने फ्रान्समधून बनून येतील. तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे उर्वरित ९० विमानांचा विकास आणि उत्पादन भारतातच सुनिश्चित करायचे आहे.
  • स्वदेशीकरणावर भर : सरकारचा भर राफेलच्या स्वदेशीकरणावर आहे. कराराच्या अटींनुसार यामध्ये ६० टक्क्यांपर्यंत स्वदेशी सुटे भाग लावले जाणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांचे पथक यावर फ्रान्सशी चर्चाही करत आहे.
  • सोर्स कोड/आयसीडी सर्वात मोठा मुद्दा: फ्रान्सवर अवलंबून न राहता राफेलमध्ये स्वदेशी क्षेपणास्त्रे, सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स जोडता यावेत अशी भारताची इच्छा आहे. यासाठी भारत इंटरफेस कंट्रोल डॉक्युमेंट म्हणजेच आयडीसीवर भर देत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *