![]()
शहरातील विमको टॉवर स्थित मुथूट फिनकॉर्प शाखेत तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने दोन सहकाऱ्याच्या मदतीने ग्राहकांनी तारण इेवलेल्या सोन्यात अपहार केल्याप्रकरणी सव्वा महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असून, ‘मुथूट’च्या संबधित
.
मुथूट फिनकॉर्पच्या शाखेतील सुवर्ण तारण गैरव्यवहार प्रकरणात कोतवाली पोलिसांकडे तक्रार करणाऱ्यांची संख्या जवळपास २१७ वर गेली. ग्राहकांच्या तक्रारींनुसार, सुमारे साडेसहा ते सात किलो सोन्याच्या अपहाराचा आरोप केला जात आहे. मात्र पोलिस, मुथूट फिनकॉर्पच्या प्राथमिक तपासणीनुसार तक्रारदार ग्राहकांच्या तारण सोन्याचा अपहार झालेला नाही. यापैकी काही तक्रारदारांचे सोने बँकेत सुरक्षित आहेत मात्र ते एकाकडून दुसऱ्याच्या नावावर ठेवले असून, नेमके कोणते सोने कोणाच्या नावावर ठेवले आहे, त्याचा शोध घेणे सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अपहार झालेल्या सोन्याचे प्रमाण तक्रारदारांच्या अंदाजापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणात १६८ ग्राहकांच्या खात्यावरील सोने एका ग्राहकाच्या नावावरून दुसऱ्या ग्राहकाच्या नावावर तारण दाखवल्याचे कंपनीच्या अंतर्गत तपासणीतून समोर येत आहे. यामुळे आता सोने गायब झाल्याचा प्रश्न राहिलेला नसून, ग्राहकांच्या तारण सोन्याची नोंद, त्यावरील कर्ज व्यवहार कोणत्या पद्धतीने हाताळले, याचा तपास पोलिस आणि कंपनीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. संबंधित तक्रारदार ग्राहकांचे सोने सुरक्षित आहे का? त्याची मालकी, तारण नोंदी कोणाच्या नावावर आहेत, याची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी एमपीआयडी कायद्यातील कलम ३ वाढवले आहे. पोलिसांनी यापूर्वी सब-रजिस्ट्रारकडे पत्रव्यवहार करून तिन्ही आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवली आहे. मात्र आता जिल्ह्यातील मालमत्तेची माहिती मिळावी म्हणून आता मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देवून या तिघांची जिल्ह्यात कुठे व कोणती मालमत्ता आहे. ही माहिती मागवण्यात येत आहे. मालमत्ता उघड झाल्यानंतर न्यायालयाची परवानगी घेऊन ती मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग यामुळे पोलिसांसमोर खुला होऊ शकतो. अशा मालमत्तेतून फसवणूक झालेल्या ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोतवालीचे ठाणेदार पीआय रोषण सिरसाठ यांनी दिली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी ५ ऑगस्टला तत्कालीन शाखा व्यवस्थापक शुभम रवींद्र वासेवाय (३१), सुरज अनिल खैरकर (३२) आणि धीरज पंचमराव सिरसाट (२९) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आता ग्राहकांना त्यांच्या सोन्याचा ताबा, तारण नोंद, आर्थिक नुकसान याबाबत ठोस दिलासा कधी मिळणार, हा मुख्य प्रश्न आहे.
ग्राहकांना प्रत्यक्ष दिलासा कधी मिळेल
शाखेतील व्यवहार सुरू ^कंपनीच्या अंतर्गत चौकशीत एकाच्या नावावरील तारण सोने दुसऱ्याच्या नावावर दिसत आहे. त्यांची संख्या १६८ आहेत. यापैकी कोणी किती रक्कम भरली कधी भरली , किती बाकी आहे, अशी माहिती त्यांच्या कडून घेत आहे. त्याची माहिती मुख्यालयाला देत असून, मुख्यालयसाकडूनअंतिम निर्णय घेण्यात येईल. ज्यांचे सोने, खाते व्यवस्थित आहे त्यांच्या साठी शाखेचे व्यवहार सुरू केले आहे. आतिष धोटे, एरीया मॅनेजर, मुथूट फिनकॉर्प.