![]()
शहरातील बुवासिद्ध बाबा यांचा यात्रा उत्सव दोन दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी रात्री काहीतरी कारणावरुन वाद निर्माण झाला आणि एका गटाने दुसऱ्या गटातील तरुण व महिलांना लोखंडी रॉड, फायटर व चॉपरने मारहाण करण्यात आली. या घटने वेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मुस्ताक चांद शेख(वय ४२, रा. बुवासिद्ध बाबा दर्गा समोर, राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, गुरुवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास मुस्ताक शेख घरासमोर असताना तेथे शहबाज अन्सार सय्यद व मंगेश झिने यांच्यात वाद चालू होता. तसेच एक गट दुसऱ्या गटातील तरुणांना मारहाण करत होते. त्यावेळी मुस्ताक शेख हे तेथे भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लोखंडी रॉड व फायटरने मारहाण केली. या मारहाणीत आठ ते दहा जण जखमी झाले असून एका जणाला जास्त मारहाण झाल्याने त्यास अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान, मुस्ताक चांद शेख यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात सूर्यतेज प्रमोद झिने, सत्यम प्रकाश दहीवाळकर, मंगेश झिने, ऋतीक सुरवसे, ऋद्राक्ष झिने, अनिकेत नारद, निखील राजू नारद, साहील संजय सुरवसे, सौरव अनिल फंड, रोहन डहाळे व इतर १० ते १५ इसम अशा एकूण २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते करत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
Source link
यात्रा उत्सवामध्ये दोन गटात मारहाण; एकजण गंभीर जखमी:20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल; परिसरात काही काळ तणाव