![]()
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत येळवण येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.पर्यावरण व सेंद्रिय शेतीचे अभ्यासक जयप्रकाश पाटील मुरुमकर यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, सेंद्रिय शेतीचे फायदे तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धनासोबतच उत्तम आरोग्य राखण्यासाठी स्वच्छता, वृक्षारोपण आणि नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच काजल दिनेश मडावी या होत्या. यावेळी उपसरपंच . आम्रपाली अनिल वाहूरवाघ, ग्रामपंचायत सदस्य नंदा कुमरे, नंदा सोनवणे, वेणू चोरपगार, अनिल मोहिते, शेषराव शेंद्रे, निरंजन गडलिंग यांच्यासह गावातील महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी गणेश सिरसाट, ग्रामपंचायत कर्मचारी किसन चव्हाण, बचत गटाच्या सीआरसी नलिनी टोबरे, ममता शेंद्रे, आशा सेविका अलका सयाम तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेश देशमुख, डी.एम. गडलिंग आणि बचत गटांच्या असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात ”माझी वसुंधरा” अभियानाविषयी माहिती देण्यात आली तसेच उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली. आरोग्य उपकेंद्र कानशिवनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या भुसारे यांनी ”आरोग्य संपन्न गाव” या योजनेविषयी मार्गदर्शन करत निरोगी गाव निर्मितीसाठी ग्रामस्थांनी आरोग्यविषयक सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.
Source link
येळवण येथे पर्यावरण दिन साजरा