Headlines

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग!:पार्थ पवारांची सलग दुसऱ्या दिवशीही शरद पवारांच्या भेटीला, 'सिल्व्हर ओक'वर राजकीय घडामोडी




राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना शनिवारी (7 जानेवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी परतले. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक नेते आणि पदाधिकारी त्यांची भेट घेत आहेत. याच दरम्यान काही राजकीय घडामोडींनी वेग घेतल्याचे चित्र आहे. शरद पवार घरी परतल्यानंतर शनिवारी संध्याकाळी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. पार्थ पवार यांनी तब्बल दीड तास शरद पवारांसोबत चर्चा केली. त्यानंतर रविवारी (8 जानेवारी) पुन्हा एकदा पार्थ पवार सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विलीनीकरणाच्या चर्चांना वेग पार्थ पवार यांच्या सलग दोन दिवसांच्या भेटी आणि रुग्णालयात प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली भेट, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार का, याविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राजेंद्र पवारांची सावध प्रतिक्रिया या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांना विचारले असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी याबाबत फारसे ऐकलेले नाही. पवारसाहेब आजारी असताना प्रफुल्ल पटेल यांनी तिथे जाऊन काहीतरी चर्चा केल्याचे समजते. पण यावर माझे, रोहितचे, पवारसाहेबांचे किंवा सुप्रिया सुळेंचे वैयक्तिक मत वेगळे असू शकते. त्यामुळे सध्यातरी या मतांना फार महत्त्व नाही. 10 तारखेला चित्र स्पष्ट होण्याची शक्यता विलीनीकरणाच्या शक्यतेवर बोलताना राजेंद्र पवार पुढे म्हणाले, दोन्ही पक्ष खरोखर विलीन होणार आहेत का? विलीन झाले तर ते भाजपला साथ देणार आहेत का? याबद्दल मला काहीही माहिती नाही आणि अजून काही स्पष्टही झालेले नाही. पण जर विलीनीकरण ठरलेच असेल, तर 10 तारखेला (जानेवारी) या गोष्टी स्पष्ट होतील असे ऐकण्यात आहे. विलीनीकरण कसे असेल आणि सत्तेत सहभाग असणार की नाही, हे पक्षाचे प्रमुखच सांगू शकतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *