Headlines

लग्नासाठी तगादा, फोटो व्हायरल करण्याची धमकी:18 वर्षीय डिप्लोमाच्या विद्यार्थिनीने संपवले जीवन, सोलापुरातील धक्कादायक घटना




लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकणे, तसेच लग्नास नकार दिल्यास वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीचा मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात समोर आली आहे. या त्रासाला कंटाळून डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आपल्या एकुलत्या एक मुलीला गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी सोलापूर परिसरातील रहिवासी होती. ती डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. रविकांत महादेव सुरवसे हा तरुण तिच्या घरी ती एकटी असताना येत असल्याचे समोर आले आहे. यावेळी तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. ‘माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करेन,’ अशी धमकीही तो तिला देत होता. वारंवार होणारा हा त्रास आणि फोटो व्हायरल करण्याच्या धमक्यांमुळे तरुणी मानसिक तणावाखाली होती. धमक्यांमुळे मानसिक तणावात, अखेर टोकाचे पाऊल संबंधित तरुणाकडून लग्नासाठी सातत्याने तगादा लावला जात होता. लग्नास नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याने तरुणीवर मानसिक दबाव निर्माण झाला होता. या त्रासातून ती अस्वस्थ होती. अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून तिने मंगळवारी (दि. 17 नोव्हेंबर) रात्री राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब कुटुंबीय आणि नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला तातडीने सोलापुरातील शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल या घटनेनंतर मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी सिव्हिल पोलीस चौकीत फिर्याद दिली. त्यानुसार मंदरूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. रविकांत महादेव सुरवसे आणि सिद्धराम उर्फ सिद्धराय सुरवसे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. या दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाढदिवसाच्या काही दिवसांतच काळाचा घाला मृत विद्यार्थिनी अभ्यासात हुशार आणि स्वभावाने मनमिळावू होती. 29 ऑक्टोबर रोजीच तिचा वाढदिवस साजरा झाला होता. कुटुंबीयांसाठी आनंदाचा असलेला हा क्षण काही दिवसांतच दुःखात बदलला. तिच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. कुटुंबातील एकुलती एक मुलगी गमावल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे पाटील यांनी अधिकृत माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची चौकशी सुरू असून तरुणीला दिलेल्या धमक्या, तिचा झालेला मानसिक छळ आणि या प्रकरणातील अन्य बाबींचा पोलीस तपास करत आहेत. हेही वाचा…. अर्थखात्यावरून राष्ट्रवादीला मुख्यमंत्री फडणवीस ब्लॅकमेल करत असल्याचा सपकाळांचा आरोप:अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणासह शेतकरी मदतीवरूनही सरकारला धारेवर धरले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरून राज्य सरकार तसेच सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला राज्याच्या अर्थखात्याचा कारभार मिळवण्याची धमक नसल्याचा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही प्रकरणांचा आधार घेऊन राष्ट्रवादीला ब्लॅकमेल करत अर्थखाते स्वतःकडे ठेवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके कोणते प्रकरण आहे आणि त्यातून कोणावर दबाव टाकला जात आहे, याचा संबंधित पक्षाने खुलासा करावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *