Headlines

हिंजवडी, माण, मारुंजीत 20 डिसेंबरपासून रस्त्यांची कामे सुरू:450 कोटींच्या कामांच्या निविदा 25 नोव्हेंबरपर्यंत; पाणी, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश




हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्यांची कामे २० डिसेंबरपासून सुरू करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. सुमारे ४५० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा २५ नोव्हेंबरपर्यंत काढण्यात येणार आहेत. कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (१९ नोव्हेंबर) त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी, कचरा आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आणि स्थानिक नागरिक बैठकीला उपस्थित होते. रस्ते विकासकामांचे तांत्रिक सादरीकरण पूर्ण झाले आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि तांत्रिक बाबी अंतिम करण्याचे निर्देश डुडी यांनी दिले. रस्त्यांचे अलाइनमेंट, भूसंपादन, हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) आणि डीपीआरमधील अडचणी दूर करण्यास सांगितले. रिंगरोडच्या कामाला प्राधान्य देऊन मोजणी प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याचे निर्देशही देण्यात आले. वाढत्या गृहसंकुलांना पुरेसा पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि सांडपाणी प्रक्रिया हे परिसरातील प्रश्न आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) सुरू करणे, सांडपाण्याचा ओव्हरफ्लो रोखणे आणि पाण्याच्या स्रोतांचे नियोजन याबाबत संबंधित यंत्रणांना अहवाल देण्यास सांगितले. मुळशी धरण आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. उघड्यावर कचरा जाळणे आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाले किंवा नदीपात्रात सोडण्याच्या प्रकारांवर प्रशासनाने कारवाईचे निर्देश दिले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून दोषींना नोटिसा द्याव्यात. नियम मोडणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले. हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि संबंधित विभागांनी समन्वयाने उपाययोजना कराव्यात, असे डुडी यांनी सांगितले. पुढील बैठकीपूर्वी सर्व विभागांनी प्रलंबित अहवाल, निविदांची स्थिती आणि सुरू झालेल्या कामांचा तपशील सादर करावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *