Headlines

लातूरच्या पेपरसेटर प्राध्यापकानेच फोडले केमिस्ट्रीचे प्रश्न- सीबीआय:21 जून रोजी पुन्हा होणार नीट परीक्षा; टीईटी 28 जूनला होणार




नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचा पेपरसेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने गुरुवारी ताब्यात घेऊन दिल्लीला नेले होते. त्याला अटक करण्यात आली. प्रा. कुलकर्णीनेच केमिस्ट्रीचे प्रश्न फोडून विद्यार्थ्यांना दिले, असा दावा सीबीआयने केला. दरम्यान, नीट प्रकरणात लातूर शहरातील क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांची शुक्रवारी (१५ मे) सकाळी ८ पासून ९ तास त्यांच्या घरातच सीबीआय पथकाने चौकशी केली. दुसरीकडे २१ जून रोजी पुन्हा नीट परीक्षा कागद-पेन्सिलवर तर पुढील वर्षी ही परीक्षा ऑनलाइन होईल, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले. त्यामुळे त्याच दिवशी होणारी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) २८ जूनला होणार आहे. लातूर येथून सायंकाळी ५.१५ वाजता सीबीआयचे पथक, काही दस्तऐवज ताब्यात घेऊन गेले.हैद्राबाद येथील सीबीआयच्या या पथकात ८ अधिकारी होते. तसेच भाषेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी एका मराठी अधिकारी पथकात होता. पथक मोटेगावकरांच्या घरी लातूरमधील सर्वात मोठ्या क्लासेसचे संचालक प्रा. मोटेगावकरांच्या सुतमील रोड परिसरातील ओमकार रेसिडेन्सी या अपार्टमेंट मधील सी-१ फ्लॅटवर सकाळी ८.३० वाजता हैदराबादेतील सीबीआयचे पथक धडकले. प्रा. मोटेगावकर, त्यांच्या पत्नी, त्यांचे आई-वडिल या सर्वांचे मोबाईल ताब्यात घेतले होते. कार्यालयातील संगणक तपासले सीबीआय पथकातील काही अधिकारी मोटेगावकरांच्या घराची झडती घेत त्यांची चौकशी करत असतानाच काही काही अधिकारी शिवनगर परिसरातील प्रा. मोटेगावकरांच्या कार्यालयात गेले. त्यांनी तेथील संगणकावरील काही माहिती तपासली, तसेच काही डेटा त्यांनी कॉपी करुन घेतल्याचे सूत्रांनी सांगीतले. त्यानंतर स्थानिक पोलिसांकडून जप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज, त्यांच्या तपासात समोर आलेली माहितीही सीबीआयने सोबत नेल्याचे सूत्रांनी सांगितले. पेपर एनटीएच्या माध्यमातून पुण्यात नीट पेपरफुटीचे जाळे एनटीए व इतर विभागांतील अधिकाऱ्यांपर्यंतही पसरलेले असू शकते, असा दावा सीबीआयने न्यायालयात केला. तपासानुसार, शुभम खैरनारला २८ एप्रिलला पुण्यातून पेपर मिळाला. धनंजय लोखंडेने पुण्यात मनीषा वाघमारे यांच्याकडून पेपर मिळवून तो शुभमला पोहोचवला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, शुभमने यश यादवसोबत १५ लाख रुपयांचा सौदा केला होता. त्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्राच्या पीडीएफ टेलिग्रामद्वारे शेअर केले. सीबीआयने यशच्या फोनमधून व्हॉट्सॲप चॅट्स मिळवले. प्रा. कुलकर्णीने पुण्यात विद्यार्थ्यांना प्रश्न, उत्तरे तोंडी सांगितली सीबीआय तपासात असे समोर आले आहे की, एनटीए परीक्षा प्रक्रियेतील पेपरसेटर आणि रसायनशास्त्राचा प्राध्यापक असलेला पी. व्ही. कुलकर्णी एप्रिलअखेर पुण्यात होता. त्याने पुण्यातून अटक केलेल्या मनीषा वाघमारे या ब्यूटिशियन महिलेच्या मदतीने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना स्वत:च्या घरी एकत्र केले. त्यांच्यासाठी विशेष शिकवणी वर्ग घेतले. लाखो रुपयांच्या मोबदल्यात त्याने विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न, त्याचे पर्याय आणि योग्य उत्तरे तोंडी सांगितली. विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रश्न आपल्या वहीत लिहून घेतले होते. हे प्रश्न ३ मे रोजी झालेल्या नीटच्या मुख्य परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळले आहेत. विद्यार्थ्यांनी आता काय करावे? विद्यार्थी पूर्वीच्या अर्जाआधारे परीक्षेला बसू शकतील. अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षेचे शहर पुन्हा निवडण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी दिला जाईल. एनटीए १४ जूनपर्यंत नवीन प्रवेशपत्रे जारी करेल. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५:१५ पर्यंत चालेल. विद्यार्थ्यांना अतिरिक्त १५ मिनिटांचा वेळ मिळेल. निकालाची तारीख निश्चित झालेली नाही. माझ्याविरुद्धच्या तक्रारींची चौकशी : प्रा. मोटेगावकर माझ्याविरोधात सीबीआयकडे कुणीतरी लेखी तक्रार केली. म्हणून सीबीआयने चौकशी केली. त्यांनी घरातील कागदपत्रे तपासली. चौकशीच्या काळात मी त्यांना संपूर्ण सहकार्य केले. – प्रा. शिवराज मोटेगावकर एनटीए अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात नवी दिल्ली | २१ जूनच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षेचे शहर पुन्हा निवडण्याची दुसरी संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करतील. दरम्यान, दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने आरोपी धनंजय लोखंडेला सहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. पेपरफुटीमध्ये सामील एनटीए अधिकारी आणि इतर विभागांना ओळखणे हादेखील तपासाचा उद्देश असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले. दरम्यान, नीट परीक्षा रद्द झाल्याने गोवा, यूपी, दिल्लीत ३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *