Headlines

विकासासाठी शिवबंधन, भालकेंच्या प्रवेशाने शिंदेसेनेला जिल्ह्यात नवे बळ:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरीतील नेत्यांवर दाखवला विश्वास



“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता मोठ्या निवडणुकांना अवकाश असतानाही, रविवारी पंढरपूरने एक अभूतपूर्व राजकीय सोहळा अनुभवला. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्यासह समर्थकांच्या शिवसेना प्रवेशाने जिल्

.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जनमानसात असलेली क्रेझ आणि स्थानिक पातळीवर भालके कुटुंबाचा असलेला मजबूत जनाधार यामुळे शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम भव्य असा झाला. एकनाथ शिंदे यांनी भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या प्रवेशाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. शिंदे यांनी पक्ष मजबुतीची अपेक्षा बोलून दाखवली आहे. गेल्या चार वर्षांपासून राजकीय गॉड फादरच्या शोधात असलेल्या भालके यांना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भक्कम आधार मिळाला. आता मरगळ झटकून भालके यांना काम करावे लागणार आहे.

भालके यांच्यासमोर लोकांच्या अपेक्षा पूर्तीचे आव्हान . शिवसेना पक्ष गाव पातळीवर घेऊन जातानाच नागरिकांच्या अपेक्षा पूर्तीचे दुबार आव्हान भालके यांच्यासमोर असेल. पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावोगावच्या विकास कामांचा पाठपुरावा सरकार दरबारी करावा लागेल. लोकांशी सहज संवाद, सहकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, सामुदायिक नेतृत्व उभा करावे लागणार आहे. . आजवर सत्ता नसल्याने त्यांच्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या, मात्र आता नगरपालिकेत अध्यक्षपद मिळाले आहे, शिवाय शिवसेने सारख्या सत्तेतील पक्षात सहभागी झाल्याने त्यांच्याकडून विकास कामाच्या, शासकीय पातळीवर, पोलीस ठाणे असो की तहसील, पंचायत समिती असो अशा ठिकाणी कार्यकर्त्यांची आपल्या गटाच्या नागरिकांची अडवणूक होत असेल तर धावून जावे लागणार आहे. . नगराध्यक्ष म्हणून प्रणिता भालके यांनी शहरी राजकारणात चांगली सुरुवात केलेली आहे, त्यांच्या प्रयत्नाला सकारात्मक साथ मिळाल्यास सत्तेचा लाभ पंढरपूर शहरासाठी चांगला होऊ शकतो, शिवाय शिवसेना या पक्षाचीही पाळे मुळे मजबूत केली होऊ शकतात. प्रशासनाला सोबत घेऊन सत्तेचा सहभाग विकास कामात दाखवून द्यावा लागणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *