Headlines

विद्यार्थ्यांनी अपयशातून धडे‎ घेत ‎यशाकडे वाटचाल करावी‎:अमित रत्नपारखी यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान‎




प्रतिनिधी | अहिल्यानगर यश मिळवण्यासाठी सातत्य, कष्ट आणि सतत शिकण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग करून नवकल्पना करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये त्यातून शिकून पुढे वाटचाल करावी, असे प्रतिपादन अमित रत्नपारखी यांनी केले. विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित ‘रिदम २ के २६’ या वार्षिक कार्यक्रमातील पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून अॅड. वसंतराव कापरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण म्हस्के, संदीप चंगेडे उपस्थित होते. अमित रत्नपारखी सध्या स्टरलाइट टेक्नॉलॉजिस लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथे ग्लोबल प्रोक्योरमेंट हेड म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. याप्रसंगी डॉ. पी. एम. गायकवाड, सेक्रेटरी जनरल विखे पाटील फाउंडेशनचे प्रा.सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ. आर. आर. नवथर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यात अकॅडमिक प्राइजेस, स्पोर्ट्स प्राइजेस, आर्ट एक्झिबिशन, पद्मश्री करंडक इत्यादींचा समावेश होता. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. सुनील मांढरे तसेच या कार्यक्रमासाठी डॉ. संदीप उदावंत, प्रा. पंकज औताडे, डॉ. कानिफ मरकड यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे संस्थेचे डायरेक्टर जनरल प्रशासन डॉ. पी. एम. गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे, संस्थेचे चेअरमन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौतुक केले. हा पारितोषिक वितरण सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून संस्थेच्या गुणवत्तापूर्ण परंपरेचे दर्शन घडवणारा ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *