Headlines

वेदांत दांडगेची राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड:विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक; 21 आणि 22 नोव्हेंबरला बारामतीत खेळणार




अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या वेदांत रवींद्र दांडगेची राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २१ आणि २२ नोव्हेंबर २०२६ रोजी बारामती येथे होणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत वाशिमच्या जिल्हा क्रीडा संकुलात विभागीय स्तरावरील शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा झाली. त्यात वेदांतने प्रथम क्रमांक मिळवला. या कामगिरीच्या जोरावर त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. वेदांतच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, पर्यवेक्षक प्रा. एस. पी. दांडगे, प्रा. विश्वास जाधव, प्रा. एस. डी. ठाकूर आणि त्याच्या प्रशिक्षकांनी अभिनंदन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षकांनीही त्याला शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय स्पर्धेत वेदांत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *